शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील ‘त्या’ बुकीच्या संपर्कात देशभरातील ९८ बुकी

By जितेंद्र कालेकर | Updated: May 30, 2018 22:49 IST

सोनू जलाल या कुख्यात बुकीचे कोणकोण साथीदार आहेत? पैशांची देवाणघेवाण ते कशा प्रकारे करत होते? अशा अनेक बाबींचा उलगडा होणे बाकी असल्यामुळे ठाणे पोलिसांनी बुधवारी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली.

ठळक मुद्देआयपीएल क्रिकेटवर सट्टाठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाईपरदेशी बुकींची होणार चौकशी

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आयपीएल तसेच क्रिकेटच्या इतर खेळांवर जगभरातून सट्टा घेणारा कुख्यात बुकी सोनू योगेंद्र जलाल (४१, रा. मालाड, मुंबई) याला आता २ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. क्रिकेटवर सट्टा लावणारे देशभरातील ९८ बुकी त्याच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी रात्री बुकी सोनूला अटक केली. त्याच्यावर यापूर्वीही मुंबई पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. २७ मे रोजी आयपीएल क्रिकेटचा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध हैदराबाद सुपरकिंग्ज असा सामना रंगला होता. याच शेवटच्या सामन्यावर सट्टा लावण्यासाठी देशभरातील मुंबई, पुणे, अहमदाबाद, कोलकाता आणि दिल्ली अशा मोठ्या शहरांमधील सुमारे ९८ बुकी हे जलालच्या संपर्कात होते. यात काही परदेशी बुकींचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचे परदेशातील कोणकोण साथीदार आहेत? पैशांची देवाणघेवाण ते कशा प्रकारे करत होते? अशा अनेक बाबींचा उलगडा होणे बाकी असल्यामुळे ठाणे पोलिसांनी बुधवारी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. ती न्यायालयाने मान्य केली. डोंबिवलीतून पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने १६ मे २०१८ रोजी तिघांना अटक केली होती. त्यांच्याच माहितीच्या आधारे पुढे खुशाल भिया (४०, रा. मालाड, मुंबई) आणि बिट्टू व्रजेश जोशी (२७, रा. मुलुंड, मुंबई) या दोघांना मुंबईतून खंडणीविरोधी पथकाने अटक केली. दरम्यान, सोनूचीही माहिती मिळाल्यानंतर त्याला २९ मे रोजी सायंकाळी मुंबईतून अटक केली. त्याच्यावर मुंबई, ठाण्यासह देशभरातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. खुशाल भिया आणि बिट्टू जोशी या त्याच्या अन्य दोन साथीदारांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

टॅग्स :thaneठाणे