शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
2
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
3
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
4
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
5
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
6
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
7
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
8
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
9
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
10
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
11
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
12
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
13
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
14
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
15
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
16
उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
17
देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
18
दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट
19
बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
20
माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोवर ९४९ कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 00:56 IST

वडाळा ते कासारवडली मेट्रोच्या माती परिक्षणाच्या कामाला ठाण्यात सुरुवात झाली असून, ही मेट्रो गायमुखपर्यंत धावणार आहे.

- अजित मांडकेठाणे : वडाळा ते कासारवडली मेट्रोच्या माती परिक्षणाच्या कामाला ठाण्यात सुरुवात झाली असून, ही मेट्रो गायमुखपर्यंत धावणार आहे. राज्य शासनाने चार अ मार्गाला याला मंजुरी देताना, मार्च २०२२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यासाठी ९४९ कोटी खर्चास शुक्रवारी मान्यता देण्यात आली.अनेक वर्षांपासून कागदावर राहिलेल्या आणि खर्चाच्या मुद्यावरून गंटाळल्या खात असलेल्या ठाणे मेट्रोला मुख्यमंत्र्यानी मागील वर्षी हिरवा कंदील दिल्यानंतर ठाण्यात माती परीक्षणाच्या कामाला वेग आला आहे. परंतु, ठाणे - घोडबंदर रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. येथील रहिवासी बस, रिक्षा किंवा इतर खाजगी वाहनांवर अवलंबून असून ते वाहतूककोंडीचा सामना करीत आहेत. त्यामुळे मेट्रो चार हा मार्ग गायमुखपर्यंत करावा अशी मागणी होती. त्यानुसार मेट्रो चारचा विस्तार गायमुखपर्यंत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाकरीता ९४९ कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यताही दिली आहे. या प्रकल्पासाठी केंद्रीय कराच्या (९२.८६ कोटी) ५० टक्के ४६.४३ कोटी व राज्य शासनाच्या कराच्या १०० टक्के ७६.३४ कोटी व जमिनीची किंमत ३५ कोटी असे एकूण १५७.७७ कोटी राज्य शासनाकडून बिनव्याजी दुय्यम कर्ज देण्यासही मान्यता दिली. प्रकल्पाच्या अंमलबजावणीस प्राधिकरणाचा स्वत:चा निधी व न्यू डेव्हल्पमेंट बँक- जपान इंटरनॅशनल कोआॅपरेशन एजेन्सी आदी आंतरराष्टÑीय वित्तीय संस्थेमार्फत २७३.७२ कोटींचे अर्थ साहाय्य घेण्यास मान्यता दिली आहे.>कारशेडसाठी ठामपाचे नियोजन२०२२ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दीष्ट असल्याने, कर्ज प्रस्ताव अंतिम होईपर्यंत प्रकल्पाच्या स्थापत्य बांधकामासाठी प्राधिकरणाचा निधी वापरायचा आहे. त्यासाठी ४४९.०८ कोटींच्या खर्चासही मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाकरीता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. मेट्रो चारचा मार्ग आणखी सुसाट झाला असून तो गायमुखपर्यंत जाणार आहे. यासाठी आधीपासूनच हालचाली केल्याने मेट्रोचे कारशेड गायमुख येथे हलविण्यासाठी पालिकेने जागेचे नियोजन केले आहे.