शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

'सैन्य दलातील ९ हजार कॅप्टन, मेजर पदं आजही रिक्त'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 16:38 IST

सेवानिवृत्त मेजर अच्युत देव यांची खंत

डोंबिवली- सैन्य दलात जाण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि देशप्रेम असण्याची गरज आहे. शारीरिक दृष्ट्या थोडी कमतरता असल्यास त्यांची तयारी करून घेता येऊ शकते. निस्वार्थी बुद्धीने देशासाठी काही करण्याची मानसिकता असल्यास चांगले काम घडेल. आपल्याकडे सैन्यदलात भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येतात. देशप्रेम आणि इच्छाशक्तीच्या अभावी ते अर्जदार सैन्यात भरती होऊ शकत नाहीत. आजही सैन्यदलातील ९ हजार जागा कॅप्टन आणि मेजर पद रिक्त आहेत, अशी खंत सेवानिवृत्त मेजर अच्युत देव यांनी व्यक्त केली.गणेश मंदिर संस्थान, नववर्ष स्वागतयात्रा संयोजन समितीतर्फे विद्यार्थी सैन्य दलात जाण्यासाठी प्रेरित व्हावी या उद्देशाने देव यांचा विद्यार्थ्यांशी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन केले होेते. यावेळी देव बोलत होते. स्वामी विवेकानंद शाळेच्या राणाप्रताप आणि गुरूकुल द डे स्कूल येथील विद्यार्थ्यांशी देव यांनी संवाद साधला. स्वामी विवेकानंद शाळेत विद्यार्थ्याशी संवाद साधताना व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सुभाष वाघमारे, कार्यवाह दिपक कुलकर्णी उपस्थित होते.देव म्हणाले, १९६५ च्या लढाईची गोष्ट सांगताना त्यांनी अब्दुल हमीद यांची शौर्यगाथा सांगितली. सैनिकांची शौर्यगाथा महत्त्वाची आहे. जाज्वल्य देशभक्ती महत्त्वाची असते. ते शिक्षण भारतीय सैन्यात दिले जाते. ते देशासाठी लढत असतात. पाकिस्तानने आपल्यावर कितीही हल्ले केले, तरी त्याला चोख उत्तर द्यायला आपले सैन्य दल सक्षमपणे उभे आहे. त्यामुळे या हल्ल्यांना घाबरण्याची गरज नाही. सैन्य दलात ज्या मानसिकतेची मुले यायला हवी आहेत ती येत नाहीत. सैन्य दलात तुम्ही किती हुशार आहात याला महत्त्व नाही. राष्ट्रप्रेम, प्रबळ इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. ज्यांना पैसा कमवायचा आहे, त्यांच्यासाठी सैन्य दल नाही. कारण सैन्य दलात मोठ्या अधिकारी पदावरदेखील तेवढा पैसा मिळत नाही. सरकार तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण व्यवस्थित होईल याची काळजी घेते. मला विद्यार्थ्यांना उदास करायचे नाही पण सत्य परिस्थिती सांगत आहे. एखाद्याने सैन्य दलाला करियर म्हणून निवडल्यावर त्या ठिकाणाहून मागे वळता येणार नाही. वाघासारखे असला तरच सैन्यदलात जा. सैन्य दलात हुशारी, समन्वय, आणि मानसिकतेची गरज असते. सैन्य दलात येण्यासाठी कोणत्याही कोचिंगची गरज नाही. देशासाठी काही करण्याची मोठी इच्छाशक्तीची गरज असते. एनडीए ही संरक्षण दलाला पूरक अशी संस्था आहे. या संस्थेत सैन्य दलासह इतर ही शिक्षण पूर्ण करता येते. काही पालक मुलांना सैन्य दलात जाण्यापासून रोखतात त्यांना समपुदेशनची गरज आहे. कारगील युध्दात ५२५ सैनिक मारले गेले. त्यापेक्षा अधिक लोक ठाणे आणि डोंबिवलीमध्ये रस्ता अपघातात मारले जातात. जीवाला धोका सर्व ठिकाणी आहे. सैनिकाला आपला शत्रू कोण हे तरी माहीत असते. रस्ता अपघातात आपल्याला कोण मारणार आहे हेदेखील माहीत नसते. दुष्ट शक्तीना मारण्यासाठी योद्ध्याची गरज असते आणि त्यासाठीच सैन्य दलात गेले पाहिजे, असे ही त्यांनी सांगितले.गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहूल दामले, उपाध्यक्षा अलका मुतालिक, विश्वस्त मंदार हळबे, अच्युत कºहाडकर, गौरी खुंटे,संयोजन समितीचे सहसंयोजक भूषण धर्माधिकारी, चिन्मय कुलकर्णी, अनिकेत घमंडी आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थी आणि शिक्षक ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सुनिल पांचाळ यांनी केले. 

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान