शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

कोरोना पुन्हा वाढत असतानाही ठाण्यात 90 टक्के बेड शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 23:38 IST

ठाणे पालिका आयुक्तांची माहिती : आयसीयूचे १९०३ बेड रिकामे

n  लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दिवाळीनंतर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत असून दुसऱ्या लाटेची शक्यताही वर्तविली जात आहे. परंतु, त्यासाठी पालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली. रुग्ण वाढत असले तरी कोरोना हॉस्पिटलची सेवा बंद केली नसल्यामुळे शहरात आजही ९० टक्के बेड शिल्लक असल्याची माहितीही त्यांनी दिली. शहरातील विविध रुग्णालयांतील ३६६८ बेडपैकी ३०३५ बेड आजघडीला शिल्लक आहेत.

कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर मे, जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांत रुग्णांची संख्या वाढताना दिसली. परंतु, याच कालावधीत महापालिकेने साकेत येथे १३०० बेडचे कोविड सेंटर सुरू केले. तसेच कळवा आणि मुंब्रा, वागळे येथेही कोविड सेंटर सुरू केल्यामुळे खाजगी रुग्णालयांत रुग्णांना बेड न मिळण्याचा ताण हलका झाला. सुरुवातीला बेड मिळविण्यासाठी दोनदोन दिवस वेटिंगवर राहावे लागत होते. परंतु, आता हव्या असणाऱ्या रुग्णालयात उपचार मिळत आहेत. महापालिकेच्या कोविड सेंटरमुळे गोरगरीब रुग्णांवर योग्य उपचार झाले. मधल्या काळात रुग्णांची संख्या कमी झाल्याने सहा कोविड रुग्णालये बंद केली. त्यामुळे ४३३४ बेडपैकी आजघडीला ३६६८ बेड उपलब्ध आहेत. त्यातील ६३३ बेड फुल्ल असून हे प्रमाण अवघे १७ टक्के असून ३०३५ बेड शिल्लक आहेत. यामध्ये ऑक्सिजन नसलेले ८५४, ऑक्सिजनचे १९०३, आयसीयूचे २७८ आणि व्हेटिंलेटरचे १३७ बेड शिल्लक आहेत.महापालिका हद्दीत असलेल्या ३२ कोविड सेंटरमध्ये तब्बल ९० टक्के बेड आजमितीस शिल्लक आहेत. सध्या एक हजार ५८८ रुग्ण हे प्रत्यक्ष उपचार घेत असून, येत्या काही दिवसांत रूग्ण वाढले तरी चिंता नाही. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास पालिका सज्ज असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

दिवाळीनंतर रूग्ण वाढले दिवाळीनंतर आठ दिवसांत ठाण्यात तब्बल एक हजार ५११ नवे रुग्ण आढळले, तर एक हजार ६० रुग्ण कोरोनामुक्त झाले. असे असले तरी महापालिकेने काही रुग्णालये बंद केल्यानंतरही उपलब्ध रुग्णालयांमध्ये ९० टक्के बेड शिल्लक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे