शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन शुल्क भरारी पथकाच्या कारवाईत मुंबईतून ९ लाखांचे विदेशी मद्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 21:47 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने सलग दुस-या दिवशी छापा टाकून मुंबईच्या वांद्रे रेल्वे टर्मिनल भागातून नऊ लाखांचे विदेशी मद्य जप्त केले.

ठळक मुद्दे कोकण विभागीय भरारी पथकाची कारवाईसलग दुस-या दिवशी मिळाला मद्य साठाटोळीचाही समावेश असल्याची शक्यता

ठाणे: अगरबत्ती विक्रीच्या नावाखाली चक्क विदेशी स्कॉच मद्याची विक्री करणा-या दोघांकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने दोन कोटींचा मद्याचा साठा हस्तगत केला. त्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे रेल्वे टर्मिनस परिसरातून नऊ लाखांचा अतिरिक्त मद्यसाठा हस्तगत केला आहे. पुंजालाल पटेल आणि बिपीन शहा या दोघांनाही तीन दिवस उत्पादन शुल्कची कोठडी न्यायालयाने दिली आहे.मुंबईतील खार जिमखाना भागातून कोकण विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संताजी लाड, दुय्यम निरीक्षक रवींद्र पाटणे तसेच मुंबई भरारी पथक -१ चे निरीक्षक मनोज चौधरी यांच्या पथकाने रविवारी रात्री पुंजालाल पटेल याच्याकडून विदेशी मद्याचा साठा जप्त केला. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे बिपीन शहा याच्याकडून अंधेरीतील ‘अ‍ॅमरॉन्ड अपार्टमेंट’ मधील गाळा क्रमांक २३ मधून विदेशी स्कॉचचे १७५ बॉक्स हस्तगत केले. भाडयाने घेतलेल्या या गाळयात अगरबत्ती विक्रीसह विदेशी मद्याचीही बेकायदा विक्री केली जात होती. या छाप्यात आयात शुल्क न भरलेल्या विदेशी स्कॉचच्या वेगवेगळया कंपन्यांचा दोन कोटींचा मद्यसाठा या पथकाने जप्त केला. शहानेच दिलेल्या माहितीवरुन सोमवारी दुपारी वांद्रे रेल्वे टर्मिनसच्या परिसरातून आणखी एक हजार मिलीच्या २४ बॉटल्स, अन्य कंपनीच्या ३६ आणि ४८ विदेशी मद्याच्या बॉटल्स असा १२ बॉक्समधील नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती उपायुक्त साळुंखे यांनी दिली. यामध्ये बेकायदेशीरपणे मद्य विक्री करणा-या टोळीचाही समावेश असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत असून त्यादृष्टीनेही तपास करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेExcise Departmentउत्पादन शुल्क विभागliquor banदारूबंदी