शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
5
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
6
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
7
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
8
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
9
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
10
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
11
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
12
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
13
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
14
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
15
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
16
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
17
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
18
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
19
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
20
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल

ज्येष्ठ नागरिकांना लुटणारा चोरटा अवघा ८३ वर्षांचा! पोलिसांना देत होता गुंगारा, अखेर आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 05:41 IST

वयाची साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास संपादन करुन त्यांना आपल्या सोबत मुंब्रा येथे येण्यास भाग पाडून त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन तसेच अंगठी काढून घेणारा अवघा ८३ वर्षीय चोरटा विजय अधिकारी याला पोलिसांनी अटक केली आहे.

- पंकज रोडेकर ।ठाणे : वयाची साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास संपादन करुन त्यांना आपल्या सोबत मुंब्रा येथे येण्यास भाग पाडून त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन तसेच अंगठी काढून घेणारा अवघा ८३ वर्षीय चोरटा विजय अधिकारी याला पोलिसांनी अटक केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना लुबाडण्यासाठी हीच पद्धत तो १९९३ साली मुंबईत राबवत होता. त्यावेळी मुंबईत पोलीस दलात काम केलेल्या अधिका-यांना चोरट्याची ही कार्यपद्धती परिचित वाटली आणि त्याचा माग काढत ते त्याच्यापर्यंत पोहोचले.अधिकारी याच्या हाताला वयोमानानुसार कंप सुटत असतानाही, आतापर्यंत तो पोलिसांना गुंगारा देत होता. वयाची ऐंशी वर्षे उलटून गेल्यावरही गुन्हेगारीचा मार्ग न सोडणा-या या शार्विलकावर तुरुंगाची हवा खाण्याची पाळी ओढवली आहे.ठाणे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना व विशेष करुन गळ्यात चेन आणि हातात अंगठ्या असलेल्यांना अधिकारी हेरत असे. अधिकारी याचे वय पाहून समोरील व्यक्ती आदराने वागवत. नेमका त्याचाच फायदा उचलत तो त्यांना लुटत होता. कधी माझे दुकान पाहण्यासाठी चला, असा बहाण तो करीत असे किंवा कधी ठाण्यातील कौपीनेश्वर मंदिरात मला ५० हजार रुपये दान करायचे आहेत. माझ्यासोबत तुम्हीही येऊन माझ्या पुण्यकार्यात सहकार्य करा, असे सांगून अधिकारी त्या व्यक्तीला रिक्षातून मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात नेत असे. तेथील एका दुकानदाराशी ओळख असल्याचे भासवून त्यांना आत नेत असे व भीती घालून त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेत असे. जुलै-आॅगस्ट महिन्यांमध्ये प्रत्येकी एक तक्रार दाखल झाली होती. े ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याची ही पद्धत परिचयाची असल्याचे ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांच्या लक्षात आली. मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्यात असताना, अशा घटना उघडकीस आल्याचे त्यांना स्मरण झाले.त्यावेळी एकाला अटक करून त्याच्याकडून नागपाडा, टीबी मार्ग, आग्रीपाडा, गावदेवी, व्ही टी रोड या पाच पोलीस ठाण्यातील २१ गुन्हे उघडकीस आणले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक अभय सायंगावकर हे कुर्ला पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक असताना, कुर्ला पोलिसांनी अशाच गुन्ह्यांत अटक केली होती, याचे त्यांना स्मरण झाले. लागलीच ठाणेनगर पोलिसांनी चक्रे फिरवून आरोपीबाबत माहिती गोळा करण्यास सुरूवात केली. मुंबई पोलिसांकडून अधिकारी याची माहिती मिळाली. त्याची खातरजमा केल्यावर टिटवाळ््यातून मुसक्या आवळल्या. तक्रारदारांनी त्याला ओळखल्याने ठाण्यातील दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्यात तपास अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक जे.एम. पाटील यांच्या पथकाला यश आले आहे.नागपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असताना, तेथे असेच गुन्हे वारंवार घडत होते. त्यामुळे अधिकारी या आरोपीवरील संशय बळावल्याने त्याची माहिती मिळवली. तक्रारदारांकडून त्याची ओळख पटल्यावर त्याला अटक केली होती. सध्या अधिकारी न्यायालयीन कोठडीत आहे. ठाण्यातील नागरिकांकरिता लुबाडण्याची त्याची ही पद्धत नवीन आहे.- मंदार धर्माधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणेनगर

टॅग्स :Crimeगुन्हा