शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

जिल्ह्यात साडेआठ हजार जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:33 AM

पालक हवालदिल: जाचक अटींमुळे अडले आरटीई प्रवेश

सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्य आदी उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या ६५२ शाळांमध्ये ‘शिक्षणाचा हक्क’ (आरटीई) या कायद्याखाली २५ टक्के जागा शालेय प्रवेशासाठी आरक्षित आहेत. यानुसार, सुमारे १४ हजार ५७७ जागा रिक्त ठेवल्या होत्या. त्यासाठी १३ हजार ४०० बालकांसाठी निवड झाली होती. यातून लॉटरी सोडतद्वारे निवड झालेल्यांपैकी केवळ सुमारे पाच हजार ८१५ बालकांचे आतापर्यंत केजी ते पहिलीच्या वर्गात प्रवेश झाले. उर्वरित सुमारे आठ हजार ७६२ जागा जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शाळांमध्ये रिक्त असल्याचे उघड झाले आहे.

आरटीईच्या या २५ टक्के आरक्षणाच्या शालेय प्रवेशासाठी पालकांनी त्यांच्या १६ हजार ३२६ बालकांचे आॅनलाइन प्रवेश अर्ज दाखल केले होते. यातून गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय आदी प्रवर्गांतील बालकांसाठी सुमारे १४ हजार ५७७ जागा आरक्षित होत्या. यासाठी जिल्ह्यासह महापालिका व नगरपालिका क्षेत्रांतून १६ हजार ३२६ बालकांचे आॅनलाइन अर्ज आले होते. त्यापैकी १३ हजार ४०० बालकांची विविध निकषास अनुसरून निवड झाली. यातून तीन फेऱ्यांमध्ये लॉटरी सोडत काढली असता त्याद्वारे निवड झालेल्यांपैकी आतापर्यंत पाच हजार ८१५ बालकांचे प्रवेश झाले. निवड झालेल्या सात हजार ५८५ बालकांचे प्रवेश झाले नाही. रिक्त जागांपेक्षा कमी विद्यार्थ्यांची निवड झालेली असतानाही बालकांच्या शालेय प्रवेशास अडथळा निर्माण झाला आहे.यामुळे अडले प्रवेशप्रवेश राउंडच्या पहिल्या लॉटरी सोडतमध्ये पाच हजार ८९६ बालकांची निवड झाली होती. त्यापैकी तीन हजार ९६७ बालकांनी शालेय प्रवेश घेतले. उर्वरित एक हजार ९२९ बालकांच्या पालकांनी दिलेल्या शाळेत जाऊन प्रवेश घेतला नाही, तर काहींना कागदपत्रांची समस्या होती. शाळा लांब असल्यामुळे काही पालकांनी प्रवेश नाकारले. आवडीची शाळा नसल्यामुळेही काही पालक शाळेच्या संपर्कात आले नाही. काही शाळांना या ना त्या कारणाखाली प्रवेश नाकारले. शुल्क आकारणीच्या कारणांसह शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्यखरेदीच्या नावाखाली काही शाळांना पालकांची अडवणूक केल्यामुळे प्रवेशास अडथळे निर्माण झाल्यामुळे काही शालेय प्रवेश होऊ शकले नाही. यामुळे पालक पुरते हवालदिल झाले आहेत.तिसºया फेरीत ५२४ प्रवेशयाप्रमाणेच दुसºया राउंडमध्ये दोन हजार ६४३ बालकांची निवड झाली. त्यातील एक हजार ३२४ बालकांचे प्रवेश निश्चित झाले. तर, तिसºया फेरीला एक हजार ३१४ बालकांची लॉटरी सोडत काढली असता त्यातून केवळ ५२४ बालकांचे आतापर्यंत प्रवेश झाले आहेत. यानंतरच्या प्रवेश राउंडबाबत अजून कोणत्या सूचना आलेल्या नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे. पहिल्या फेरीत पाच हजार ८९६ बालकांना पहिली ते केजीच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. यापैकी पहिल्या फेरीत तीन हजार ९५७ बालकांचा प्रवेश निश्चित झाला.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाthaneठाणे