शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
2
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
3
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
4
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
5
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
6
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
7
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
8
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
9
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
10
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
11
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
12
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
13
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
14
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
15
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
16
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
17
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
18
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
19
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
20
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
Daily Top 2Weekly Top 5

मॅरेथॉन स्पर्धेत धावणार २० हजार स्पर्धक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 23:39 IST

१८ ऑगस्टला रंगणार तिसाव्या महापौर मॅरेथॉनचा थरार : ‘रन फॉर स्मार्ट सिटी’ हे घोषवाक्य

ठाणे : तिसावी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यंदा १८ आॅगस्ट रोजी होणार असून या स्पर्धेत २० हजार स्पर्धक सहभागी होतील, असा अंदाज महापौर मीनाक्षी शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यंदाच्या स्पर्धेचे आकर्षण म्हणजे महिलांसाठीदेखील २१ किमीची स्पर्धा आयोजिली आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध गटांमध्येही स्पर्धा होणार असून किन्नर समाजदेखील यात सहभागी होणार आहे. ‘रन फॉर स्मार्ट सिटी’ या घोषवाक्याखाली ही स्पर्धा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.या पत्रकार परिषदेस उपमहापौर रमाकांत मढवी, सभापती-स्थायी समिती राम रेपाळे, सभागृह नेते नरेश म्हस्के, सभापती-क्रीडा समिती अमर पाटील, उपायुक्त संदीप माळवी, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सचिव मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.१८ आॅगस्ट रोजी सकाळी ६ वाजता महापालिका मुख्यालय चौकातून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ती विविध ११ गटांत घेण्यात येणार आहे. पहिल्या पाच गटांतील स्पर्धा महाराष्ट्र राज्यस्तरावर असून, पुरुष २१ किमी स्पर्धेतील विजेत्यांसाठी पहिले बक्षीस ७५ हजार, दुसरे बक्षीस ४५ हजार, तिसरे बक्षीस ३० हजार, चौथे १५ हजार अशी आहेत. त्याशिवाय, पाच ते १० पर्यंतच्या विजेत्यांसाठीही आकर्षक बक्षिसे ठेवली आहेत. स्पर्धेचा समारोपदेखील महापालिका मुख्यालयाच्या ठिकाणीच होणार आहे.महिलांच्या १० किमी स्पर्धेसाठी पहिले बक्षीस २५ हजार, दुसरे २० हजार, तिसरे १५ हजार, चौथे १० हजार अशी असून ५ ते १० पर्यंतच्या विजेत्यांनाही आकर्षक बक्षिसे ठेवली आहे. ही स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार असून हिरानंदानी इस्टेट येथे समाप्त होणार आहे. १८ वर्षांवरील १० किमी ही स्पर्धा खारीगाव ते कोपरीमार्गे महापालिका भवन अशी असणार आहे. पाचवा गट हा १८ वर्षांखालील मुलांसाठी असून ही स्पर्धा १० किमी तसेच नव्याने सुरू केलेल्या २१ किमी महिलांच्या स्पर्धेसाठी पहिले बक्षीस ७५ हजारांचे असणार आहे. जिल्ह्यासाठी मर्यादित १५ वर्षांखालील मुलांमुलींसाठी पाच किमी व १२ वर्षांखालील मुलांमुलींसाठी तीन किमी अंतराची स्पर्धा ठेवण्यात आली आहे. स्पर्धेची सुरुवात महापालिका भवन येथे होऊन माँसाहेब मीनाताई ठाकरे चौक येथे संपेल. तीन किमीची स्पर्धा महापालिका भवन येथे संपेल. स्पर्धकांसाठी मोफत बससेवेची सुविधा असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहनही महापौरांनी केले.ज्येष्ठ नागरिक आणि महिला, पुरुष वेगळा गटठाणे जिल्ह्यांसाठी मर्यादित ज्येष्ठ नागरिक ६० वर्षांवरील महिला व पुरु षासाठी वेगळा गट असून या गटातील पहिल्या पाच विजेत्यांसाठी रोख बक्षिसे आणि मानचिन्ह देण्यात येणार आहेत. महापालिका ते बाटा शोरूम (नितीन कंपनी) अशी अर्धा किमीची ही स्पर्धा असणार आहे.रुग्णांचाही सहभाग राहणारयाचप्रमाणे यंदाही दोन किमी रन फॉर स्मार्ट ठाणे ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत महापालिका कर्मचारी तसेच पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर यांनी केले. यावर्षी महापालिकेसोबत मेडिकल पार्टनर असणारे ठाणे शहरातील नामांकित ज्युपिटर हॉस्पिटलमधील अर्धांगवायूतून पूर्ण बरे झालेले रु ग्ण या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच नामवंत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या प्रेरणेतून उभारलेली त्रिदल फाउंडेशन संस्थेतील २५ ते ३० विद्यार्थीही यामध्ये सहभागी होणार आहेत. तर, यावर्षी प्रथमच किन्नर समाजदेखील या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे.एकूण २२१ पंच, ९२ पायलट, २१० सुरक्षारक्षक, शेकडो स्वयंसेवक आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी स्पर्धेच्या यशस्वितेसाठी मेहनत घेत आहेत. या स्पर्धेसाठी महापालिकेने विविध सेवा उपलब्ध करून दिल्या असून त्यामध्ये स्पर्धकांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी, स्पर्धेच्या मार्गावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन सेवा पथके, तत्काळ वैद्यकीय सेवा, प्रशिक्षित डॉक्टर व परिचारिकांसह रु ग्णवाहिका, स्पर्धेच्या मार्गावर विविध टप्प्यांवर प्राथमिक उपचार केंद्रे उपलब्ध होणार आहेत.

टॅग्स :Marathonमॅरेथॉन