शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, ठाण्यातील ६९२ विद्यार्थ्यांची आठ कोटींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:13 IST

बनावट डी-फार्मसीचे प्रमाणपत्र मिळवून त्याआधारे औषध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दुकानदार आणि त्यांना बनावट प्रमाणपत्रे देणाºया पुरुषोत्तम ताहिलरामानी यांच्यासह १७ जणांच्या टोळीला यापूर्वीच ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली होती. आता याच प्रकरणात राजस्थान विद्यापिठानेच या डी फार्मसीच्या ६९२ विद्यार्थ्यांची आठ कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा न्यायालयामार्फत ताहिलरामानी यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

ठळक मुद्देराजस्थानच्या ओपीजीएस विद्यापिठाविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल न्यायालयाच्या आदेशाने कापूरबावडी पोलीस ठाण्यात फिर्याद आधी आरोपी असलेल्या दीप पॅरामेडिकल आॅरगनायझेशनचे संचालक पुरुषोत्तम ताहिलरामानी यांनीच केली तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बनावट डी फार्मसी तसेच अन्य पदविकांसाठी प्रवेश देण्याच्या नावाखाली मुंबई ठाण्यातील सुमारे ६९२ विद्यार्थ्याची आठ कोटी ३९ लाख ५१ हजार ८०० रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा राजस्थानच्या ओपीजेएस विद्यापिठाविरुद्ध काूपरबावडी पोलीस ठाण्यात नुकताच दाखल झाला आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणामध्ये यापूर्वी गुन्हा दाखल झालेले दीप पॅरामेडिकल आॅरगनायझेशनचे संचालक पुरुषोत्तम ताहिलरामानी (७३) यांनीच न्यायालयामार्फत हा गुन्हा दाखल केल्याने या प्रकाराला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.बनावट डी-फार्मसीचे प्रमाणपत्र मिळवून त्याआधारे औषध विक्रीचा व्यवसाय करणाºया दुकानदार आणि त्यांना बनावट प्रमाणपत्रे देणाºया ताहिलरामानी यांच्यासह १७ जणांच्या टोळीला यापूर्वीच ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. ताहिलरामानी यांचे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी प्रलंबित आहे. या आधी दहावी आणि बारावीची बनावट प्रमाणपत्र बनविल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसरा गुन्हा बनावट विद्यापिठाची प्रमाणपत्रे दिल्याप्रकरणी विद्यार्थ्यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल केला आहे. पहिल्या गुन्ह्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने कारवाई केली आहे. आता ताहिलरामानी यांनी ठाणे न्यायालयामार्फत कलम १५६ नुसार दाखल केलेल्या याचिकेनुसार ओपीजेएस विद्यापिठाचे अध्यक्ष जोगिन्दर सिंह तसेच जितेंद्र कुमार यादव, ओपीजेएसचे समन्वयक दीपक पुरी आणि सचिव प्रिया जैन आदींविरुद्ध १२ आॅक्टोबर २०१९ रोजी गुन्हा दाखल केला आहे. दीप पॅरामेडिकल च्या माध्यमातून २०१५ ते २०१८ या तीन वर्षांच्या काळात प्रवेश घेतलेल्या ६९२ विद्यार्थ्यांची शुल्कापोटी आठ कोटी ३९ लाखांची रक्कम घेण्यात आली. परंतु, या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्यात आले नाही. त्यामुळे ताहिलरामानी यांनी न्यायालयामार्फत हा गुन्हा कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. तर डी आणि बी फार्मसी कॉलेजचे प्रशिक्षण घेण्याबाबतची कोणतीही अधिकृत मान्यता नसतांना राजस्थानचे ओपीजीएस विद्यापीठ आणि इतर विद्यापिठांच्या नावाने प्रवेश दाखवून दोन लाख ६७ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी ठाण्याच्या मनोरमानगर येथील उमाकांत यादव (२१) या तरुणाने यापूर्वीच ताहिलरामानीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पण, याच प्रकरणात ताहिलरामानी यांनी राजस्थानच्या विद्यापिठाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.

‘‘ ताहिलरामानी यांनी राजस्थानच्या विद्यापिठाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयामार्फत हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी एक पथक राजस्थानला पाठविण्यात येणार आहे.’’अनिल देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कापूरबावडी पोलीस ठाणे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी