शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

ग्रामपंचायतींंत 786 महिला आल्या सत्तेत, विजयी पुरुष उमेदवारांपेक्षाही जास्त प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 9:14 AM

एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या १५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. प्रत्यक्षात १४३ ग्रामपंचायतींच्या ९९४ सदस्यांसाठी मतदान होऊन निवड झाली. आठ ग्रामपंचायतींचे ४१७ सदस्य बिनविरोध निवडून आले.

सुरेश लोखंडे-ठाणे : जिल्ह्यातील गावखेड्यांचा कारभार पाहणाऱ्या १५८ ग्रामपंचायतींच्या एक हजार ४७२ सदस्यांसाठी निवडणुका पार पडल्या. यापैकी एक हजार ४११ विजयी घोषित झाले. यामध्ये ७८६ महिलांनी बाजी मारली असून, जिल्हाभरात केवळ ६२५ पुरुषांना विजयी होता आले.एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या १५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. प्रत्यक्षात १४३ ग्रामपंचायतींच्या ९९४ सदस्यांसाठी मतदान होऊन निवड झाली. आठ ग्रामपंचायतींचे ४१७ सदस्य बिनविरोध निवडून आले. उर्वरित ठाणे तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या ६१ सदस्यांसाठी उमेदवारी अर्ज न आल्यामुळे या गावपाड्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली नाही. एकूण १४११ सदस्यांनी विजयश्री खेचून आणली. यामध्ये ७८६ महिलांनी विजयी होऊन गावाची सत्ता हस्तगत केली आहे. त्यांच्या तुलनेत जिल्ह्यात ६२५ पुरुष विजयी झाले आहेत. या निवडणुकीद्वारे ग्रामपंचायतींच्या सत्तेत महिला प्रबळ असल्याचे उघड झाले आहे. भिवंडी तालुक्यात ५६ ग्रामपंचायतींच्या ५७४ सदस्यांसाठी निवडणुका झाल्या. यापैकी ३१७ महिला सदस्य विजयी झाल्या. यात बिनविरोध निवड झालेल्या पाच ग्रामपंचायतींच्या सदस्यांचाही समावेश आहे. या तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज आले नाहीत. मुरबाड तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींच्या ३३८ सदस्यांसाठी निवडणूक झाली. यामध्ये १९१ महिला विजयी झाल्या आहेत. कल्याण तालुक्यातही हीच स्थिती आहे. येथील २१ ग्रामपंचायतींच्या १११ सदस्यांपैकी २१६ महिलांचा विजय झाला आहे. अंबरनाथ तालुक्यामधील २७ ग्रामपंचायतींच्या २४७ सदस्यांमध्ये १३४ महिलांनी विजयश्री खेचून आणली. शहापूरच्या पाच ग्रामपंचायतींच्या ५१ सदस्यांपैकी २८ महिला सदस्यांनी बाजी मारली. 

गोरेगाव ग्रामपंचायतीत सर्वाधिक महिलाजिल्ह्यात सर्वात लहान ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या मुरबाड तालुक्यातील चिरड येथील सात सदस्यांपैकी पाच महिला सदस्यांनी विजय मिळवून  महिलाराज प्रस्थापित केले. अंबरनाथ तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायतीत नऊ सदस्यांची बिनविरोध निवड झाली. त्यात सहा महिला आहेत. येथील मुस्लीम महिला सदस्यांचे नेतृत्व वाखाणण्याजोगे आहे.

लोकहिताची कामे प्राधान्याने करण्याची महिला सदस्यांची ग्वाही -ग्रामपंचायतीचे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाल्याने समस्यांची वानवा नाही. पुढील पाच वर्षांत पक्के अंतर्गत रस्ते, सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी उत्तम गटार व्यवस्था व सर्व सदनिकाधारकांना मुबलक पाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू.- ज्योती प्रशांत भोईर, सदस्या, ग्रामपंचायत चेरपोली, ता. शहापूर

मी कातकरी आदिम जमातीतून अनुसूचित जमाती महिला राखीव जागेवर विजयी झाली आहे. मला श्रमजीवी संघटनेचे पाठबळ मिळाले आहे. या संधीतून मी गावाचा सर्वांगीण व पर्यावरणपूरक विकास साधण्याचा प्रयत्न प्राधान्याने करेल. श्रमजीवी संघटनेच्या शिस्तबद्ध आणि लोकहिताच्या मार्गाने येत्या काळात मुबलक पाण्यासह रस्ते, दिवाबत्ती आदी कामे प्राधान्याने करेन.- लक्ष्मी मुकणे, सदस्य, ग्रामपंचायत वारेट, खातिवली, ता. भिवंडी

बिनविरोध निवडून देत माझ्यावर गावाच्या विकासासाठी विश्वास टाकला आहे. माझ्या यशाची ही पहिली पायरी आहे. मी गावातील महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबविण्यासह बचत गटाच्या माध्यमातून उद्योग-व्यवसायाला चालना मिळावी म्हणून मी प्रयत्नशील राहीन. शिलाई मशीन प्रशिक्षण, गृहउद्योगाची निर्मिती करून महिलांचे सबळीकरण करेन. शासनाच्या विविध योजनांची ग्रामपंचायत स्तरावर काटेकोरपणे अंमलबजावणी करेन.- अक्षता वाघचौडे, सदस्या, ग्रामपंचायत खांडपे, ता. मुरबाड

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकWomenमहिला