शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

गोवर बाधीत ७५ टक्के रुग्णांचे लसीकरण झालेच नाही

By अजित मांडके | Updated: December 2, 2022 17:15 IST

मुंब्रा, शिळ, कौसा, आतकोनेश्वर नगर आदी भागात गोवर रुग्णांची संख्या अधिक असल्याचेही दिसून आले आहे.

ठाणे  :

ठाणे  महापालिका हद्दीत गोवरने आणखी एक मृत्यु झाला आहे. ठाण्यात गोवर बाधीत रुग्णांची संख्या वाढत असून आतार्पयत ८१ जणांना याची लागण झाली असून त्यातील ७५ टक्के रुग्णांचे लसीकरणच झाले नसल्याची गंभीर बाब ठाणो महापालिकेने केलेल्या सव्र्हेक्षणात आढळून आले आहे. तर मुंब्रा, शिळ, कौसा, आतकोनेश्वर नगर आदी भागात गोवर रुग्णांची संख्या अधिक असल्याचेही दिसून आले आहे. त्या खालोखाल उथळसर आणि इतर भागात २ ते ३ रुग्ण आढळून आले आहेत.ठाणे  महापालिका हद्दीत मागील काही दिवसापासून गोवर बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. त्यात गुरुवारी आणखी एका दिड वर्षाच्या बाळाचा गोवरमुळे मृत्यु झाल्याची बाब समोर आली आहे. दुसरीकडे गोवर बाधीत रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यासाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यानुसार कळवा आणि पार्कीग प्लाझा येथे रुग्णांना उपचारासाठी दाखल करुन घेतले जात आहे. परंतु आतार्पयत आढळलेल्या एकूण ८१ रुग्णांपैकी २ जणांचा मृत्यु झाला असून यातील ७५ टक्के रुग्णांचे गोवर लसीकरण झाले नसल्याची गंभीर बाब निर्दशनास आली आहे.

ठाणे महापालिकेने घरोघरी जाऊन सुरु केलेल्या सर्वेक्षणात गोवर संशयित रुग्णांचा शोध घेण्याबरोबरच गोवर रुबेला लस घेतलेली नाही अशा मुलांचाही शोध घेण्यात येत आहे. या सर्वेक्षणासाठी १६० पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी १४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत २ लाख ७६ हजार २२४ घरांपैकी २ लाख २३ हजार ४१८ घरांचे सर्वेक्षण पुर्ण केले आहे. त्यात ताप आणि गोवरची लक्षणे असलेल्या मुलांची माहिती घेऊन त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. घरोघरी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ३२८ गोवर संशियत रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ३२५ जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ३०३ जणांचे तपासणी अहवाल आतापर्यंत प्राप्त झाले आहेत. त्यात ८१ जण गोवरबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यातील ६६ ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत तर, १५ जण महापालिका क्षेत्राबाहेरील आहेत.  मुंब्रा, कौसा, एमएम व्हॅली, शीळ आणि आतकोनेश्वरनगर या भागात गोवरचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे तर, त्या तुलनेत उथळसर आणि शहराच्या इतर भागात दोन ते रुग्ण आढळून येत आहेत. घरोघरी सर्वेक्षणादरम्यान ८ हजार ६८७ मुलांनी गोवर रुबेला लस घेतलेली नसल्याचे आढळून आले असून त्यांचे विशेष लसीकरण शिबीरांमध्ये लसीकरण करण्यात आले आहे. त्यातील १७१७ मुलांना गोवर रुबेलाची पहीली मात्रा, २०८२ मुलांना दुसरी मात्रा आणि ४८८८ मुलांना वर्धक मात्रा देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.