शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेनसाठी ७५ लाख मे. टन सिमेंट, २१ लाख मे. टन हवे पोलाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 02:00 IST

प्रकल्पाच्या बांधकामाशी संबंधित विविध कामांसाठी ५१ हजारांहून अधिक तंत्रज्ञ, कुशल आणि अकुशल कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे.

- नारायण जाधवठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ४६० किमी लांबीचे व्हायाडक्ट्स, समुद्राखालून जाणाऱ्या सात किमी लांबीच्या बोगद्यासह २६ किमी लांबीचे बोगदे, २७ पोलादी पूल, १२ स्थानके आणि इतर संरचनांच्या निर्मितीसाठी ७५ लाख मेट्रिक टन सिमेंट आणि २१ लाख मेट्रिक टन पोलाद लागणार आहे.या प्रकल्पासाठी विविध श्रेणींमधील ९० हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत तसेच त्याच्याशी संबंधितपुरवठासाखळी आणि संबंधित सेवा यांसाठीही मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. प्रकल्पाच्या बांधकामाशी संबंधित विविध कामांसाठी ५१ हजारांहून अधिक तंत्रज्ञ, कुशल आणि अकुशल कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे.अकुशल कामगारांना बांधकामाशी संबंधित प्रशिक्षणाचे काम एनएचएसआरसीएलने सुरू केले असून त्यात बार बेंडिंग, टाइल लेइंग, इलेक्ट्रिकची कामे, काँक्रिटिंग, प्लास्टरिंग इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या प्रशिक्षणातून अकुशल कामगारांना रोजगाराभिमुख करण्याबरोबरच त्यांना उत्पन्नाच्या संधीही प्राप्त होणार आहेत, अशी माहिती प्रवक्ता सुषमा गौर यांनीशुक्रवारी दिली.दोन महिन्यांत निविदांना अंतिम स्वरूप1बांधकामाशी संबंधित काही महत्त्वाच्या निविदा उघडल्या जाणार असून येत्या दोन महिन्यांमध्ये त्यांना अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.2या निविदा मुख्यत: संरचना आणि बांधकामाशी संबंधित असतील, यात व्हायाडक्ट्स, पूल, मेंटेनन्स डेपो, स्थानके (वापी, बिलिमोरा, सुरत आणि भरूच आणि सुरत डेपो, अंदाजे २३७ किमी) याबरोबरच व्हायाडक्ट आणि पूल, क्रॉसिंग पूल, मेंटेनन्स डेपो आणि स्थानके (आणंद/नडियाद, बडोदा आणि अहमदाबाद यादरम्यान अंदाजे ८८ किमी) या कामांचा समावेश असेल.3तसेच रस्ते/नद्या/रेल्वे/इतर संरचना यांच्यावरून बुलेटचा मार्ग जाणार असल्याने ३३ पुलांची उभारणी करावी लागणार आहे. यासंदर्भातील खरेदी, फॅब्रिकेशन, चेक-असेम्ब्ली इत्यादी कामांचाही या निविदांमध्ये समावेश असेल.आतापर्यंत ६४ टक्के भूसंपादनप्रकल्पासाठी आतापर्यंत ६४ टक्के जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. त्यात गुजरात आणि दादरा-नगर-हवेलीमधील ८२ टक्क्यांहून अधिक तर महाराष्ट्रातील २३ टक्के जमिनीचा समावेश आहे.

टॅग्स :thaneठाणेBullet Trainबुलेट ट्रेन