शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
5
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
6
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
7
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
8
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
9
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
10
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
11
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
12
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
13
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
14
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
15
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
16
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
17
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
18
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
19
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
20
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त

ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७३४ कोरोना रुग्ण सापडले; पाच जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 20:33 IST

ठाणे : जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनाचे ७३४ रुग्ण गुरूवारी आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

ठाणे : जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनाचे ७३४ रुग्ण गुरूवारी आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ६३ हजार १४ रुग्णांची नोंद झाली असून मृतांची संख्या सहा हजार २५६ झाली आहे.  ठाणे शहरात २२४ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६१ हजार ७४५ झाली आहे. शहरात एकही  मृत्यू न झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ३८२ कायम आहे. कल्याण - डोंबिवलीत २२७ रुग्णांची आज वाढ झाली असून दोघांचा मृत्यू आहे. आता ६२ हजार ६०९ रुग्ण बाधीत असून एक हजार १९५ मृत्यूची नोंंद आहे. उल्हासनगरमध्ये १६ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ८०३ झाली. तर, ३७२ मृतांची संख्या आहे. भिवंडीला सहा बाधीत आढळून आले असून एक मृत्यू आहे. आता बाधीत सहा हजार ७६९ असून मृतांची संख्या ३५५ आहे. मीरा भाईंदरमध्ये ६४  रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे.या शहरात बाधितांची संख्या २६ हजार ९७० असून मृतांची संख्या ८०३ आहे.

अंबरनाथमध्ये १५ रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. येथे बाधीत आठ  हजार ७६५ असून मृत्यू ३१५ आहेत. बदलापूरमध्ये ३९ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत नऊ हजार ८२१ झाले असून एकही मृत्यू नाही. मृत्यूची संख्या १२६ आहे. ग्रामीणमध्ये २१ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत १९ हजार ४८८ आणि आतापर्यंत ५९२ मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे