शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

ठाणे जिल्ह्यात ७२९ कोरोनाबाधित, मृतांचा आकडा २१ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 04:36 IST

तर कल्याण डोंबिवलीत नव्याने सापडलेल्या ८ रुग्णांमध्ये खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी महिला, कर्मचारी, शासकीय परिवहन विभागातील चालक, बँक कर्मचारी यांचा समावेश आहे.

ठाणे : रविवारी जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने आणि सोमवारीही ४४ नवे रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णांची संख्या ही ७२९ इतकी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक १५ रुग्ण हे ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात मिळून आल्याने आतापर्यंत येथील रुग्णांची संख्या २४१ इतकी झाली आहे.सोमवारी आणखी एकाचा मृत्यू झाला असून शहरातील मृतांची संख्या ही ९ तर जिल्ह्यातील मृतांचा आकडा २१ वर गेला आहे. तर कल्याण डोंबिवलीत नव्याने सापडलेल्या ८ रुग्णांमध्ये खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी महिला, कर्मचारी, शासकीय परिवहन विभागातील चालक, बँक कर्मचारी यांचा समावेश आहे.ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रु ग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. असे असले तरी, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहे. मात्र ठाण्यातील रुग्णांची संख्या ही आता रोजच्या रोज दुपटीने वाढतांना दिसत आहे. रविवारी १७ रुग्ण आढळल्यानंतर सोमवारी ठाणे पालिकेच्या हद्दीत एकाच दिवशी १५ नवीन रु ग्णांची नोंद झाली असून त्यात एकाचा मृत्यू झाली आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या २४१ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा नऊ झाला आहे. तसेच कल्याण डोंबिवलीत आठ नव्या रु ग्णांची नोंद झाली असून रु ग्णांची संख्या १३७ वर गेली आहे. तर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १५ नव्या रु ग्णाची नोंद झाली असून तेथील रु ग्ण संख्या १४७ इतकी झाली असून आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे.उल्हासनगर महापालिका क्षेत्रात एका रु ग्णांची नोंद झाल्याने तेथील आकडा तीन वर पोहोचला आहे. तर बदलापूरमध्ये तीन बाधित नव्या रु ग्णांची नोंद झाल्याने तेथील आकडा २० वर पोहोचला आहे.>ग्रामीण भागात एकही नवा रुग्ण नाहीमीरा भार्इंदर, भिवंडी, अंबरनाथ आणि ठाणे ग्रामीण भागात एकही नव्यारु ग्णाची नोंद झाली नसल्याची माहिती जिल्हा रु ग्णालय प्रशासनाने दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या