शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ८३ रुग्णालयांत ७,१३१ बेड रिक्त; कोरोनाची दुसरी लाट आल्यास प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 23:32 IST

कोरोनाची दुसरी लाट आल्यास प्रशासन सज्ज : सुविधांचा घेतला आढावा

ठाणे  : ठाणे जिल्ह्यात कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. ठाणे जिल्ह्यातील मनपा, नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रात असलेले कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरसह जिल्हा कोविड रुग्णालय अशा ८३ रुग्णालयांमध्ये आठ हजार ७८४ खाटांची संख्या असून सात हजार १३१ खाटांची उपलब्धता असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. कोरोनाची दुसरी लाट आल्यास प्रशासन सज्ज असून भविष्यातील रुग्णांची गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे.    

ठाणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाने शिरकाव केला. सुरुवातीला तुरळक प्रमाणात असलेल्या या आजाराने मे, जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात हाहाकार उडविला होता. सध्या जिल्ह्यातील सहा महानगरपालिका व ठाणे ग्रामीण भागातील बाधित रुग्णांची संख्या दोन लाख ६१ हजार ६६७ इतकी झाली असून त्यापैकी दोन लाख ५० हजार ७४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, आतापर्यंत सहा हजार २४६ जणांना जीव गमवावे लागले आहे. 

कोरोनाच्या संसर्गाच्या सुरुवातीला या आजाराने घातलेले थैमान यामुळे अनेकदा कोरोना बाधितांना बेड उपलब्ध न झाल्यामुळे व त्यांच्यावर उपचार न झाल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागल्याची ओरड होत होती. त्यात जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयातील असलेली खाटांची क्षमता रुग्णांच्या तुलनेत अपुरी पडू लागली होती. याची गांभीर्याने दाखल घेऊन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरसह जिल्हा कोविड रुग्णालय सुरू करण्यात आली होती.

तसेच जिल्ह्यातील सहा महापालिका क्षेत्रांतर्गत पालिका आयुक्तांनी कोविड केअर सेंटर सुरू करण्याबरोबरच अनेक खासगी रुग्णालयांचे कोविड रुग्णालयात रुपांतर केले होते. मात्र, मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याने व रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने अनेक रुग्णालयाचे सामान्य रुग्णालयात रुपांतर केले होते. असे असताना आता, मागील १५ दिवसांपासून कोरोनाने आपले डोके पुन्हा वर काढले आहे. यामुळे यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आतापासून कंबर कसली आहे.    जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका आणि ग्रामीण भागातील पाच तालुक्यातील क्षेत्रातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि जिल्हा कोविड रुग्णालय यांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे