शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

७१० इमारतींवर टांगती तलवार, पुन्हा ‘साईराज’ची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 3:13 AM

ठाणे : किसरनगर भागातील धोकादायकच्या यादीत असलेल्या विजय निवास या इमारतीच्या तिस-या मजल्यावरील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत एका वृद्धाला जीव गमवावा लागला असून तीन महिला जखमी झाल्या आहेत.

अजित मांडके ठाणे : किसरनगर भागातील धोकादायकच्या यादीत असलेल्या विजय निवास या इमारतीच्या तिस-या मजल्यावरील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत एका वृद्धाला जीव गमवावा लागला असून तीन महिला जखमी झाल्या आहेत. यामुळे किसनगर भागातील दाटीवाटीने वसलेल्या तब्बल ७१० इमारती या धोकादायकच्या यादीत असल्याची माहिती समोर आली आहे. या इमारतीमधील हजारो रहिवासी आपला जीव मुठीत घेऊन मागील कित्येक वर्ष वास्तव्य करीत आहेत.विजय निवास इमारतीच्या बाबतीत विचार केल्यास या इमारतीच्या तिसºया मजल्यावरील घराचा स्लॅब हा दुसºया मजल्यावर पडला आणि यात एकाचा मृत्यू झाला. प्रथम दर्शनी ही इमारत राहण्यास योग्य वाटावी म्हणून अंतर्गत डागडुजी बरोबर ओव्हरलोड केल्याचे बोलले जात आहे. परंतु, आता या भागातील सर्व अनधिकृत धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसे पाहिल्यास संपूर्ण किसनगर भाग हा अनधिकृत इमारतींचा भाग म्हणून ओळखला जातो. वागळे पट्टा हा पूर्वी औद्योगिक पट्टा म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे दुरवरून येथे कामाला चाकरमानी येत होते. त्यांचे वास्तव्यच या भागात करून देण्यासाठी एकामागून एक इमारतींचे जाळे येथे उभारण्यात आले. त्यातून १९९० -९१ च्या दशकात किसननगर आणि शांतीनगरचा उदय झाला. याच भागात दाटीवाटीने इमारती उभारल्या गेल्या. राजकीय मंडळींनी, काही छोट्या मोठ्या कंत्राटदारांनी एकेक इमारत अवघ्या एक ते दोन महिन्यात उभ्या केल्या. विशेष म्हणजे यासाठी चांगल्या सिमेंटऐवजी सागोळी नावाच्या सिमेंटचा वापर केल्याचेही बोलले जाते. या सिमेंटचा दर्जा खालावलेला आहे. त्यामुळे आता या इमारती जीर्ण झाल्या आहेत. पालिकेच्या काही अधिकाºयांनी, स्थानिक राजकीय मंडळींनी याच अनधिकृत इमारतींच्या माध्यमातून आपले चांगभले केले. त्याचे भोग रहिवाशांना भोगावे लागत आहेत.वागळे भागातील किसननगर भागात असलेल्या आणि गटारावरच उभारण्यात आलेली साईराज ही इमारत ७ नोव्हेंबर १९९८ च्या दिवशी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत १६ जणांना जीव गमवावा लागला, तर १४ जण जखमी झाले. ही घटना घडल्यानंतरही या भागात अनधिकृत इमारतींचे जाळे मात्र कमी झाले नाही. आजही येथे १५०० हून अधिक अनधिकृत इमारतींचे जाळे आहे. यापूर्वी एक हजाराहून अधिक इमारती धोकादायकच्या यादीत होत्या. आता त्यांची संख्या ७१० च्या घरात आहे. पालिकेकडून कारवाईची नोटीस आली की तात्पुरती डागडुजी आणि रंगरंगोटी करून इमारत राहण्यास योग्य असल्याचे भासवले जाते. परंतु, रहिवाशांच्या लक्षात येत नाही की, आपण साक्षात मृत्यू अंगावर घेऊन झोपत आहोत. पालिकादेखील याकडे कानाडोळा करतांना दिसत आहे. एवढ्या दाटीवाटीने या इमारती उभारण्यात आल्या आहेत की, भविष्यात एखादी दुर्घटना घडली तर साधी अ‍ॅम्ब्युलन्स किंवा अग्निशमन विभागाची गाडीदेखील जाणे दुरापास्त होणार आहे.।दाटीवाटीने वसल्या आहेत इमारतीकिसननगरमध्ये पायाखाली पाण्याच्या लाईनचे जाळे आहे. ठिकठिकाणी खड्डे खणण्यात येत आहेत. त्यामुळे आधीच या इमारतींचा पाया हा कच्चा असल्याने पुन्हा अशा प्रकारे खड्डे खोदले जात असल्याने त्याचा त्रासदेखील या इमारतींना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवा, पाणी, किंवा साधे सूर्याचे दर्शनदेखील येथील रहिवाशांना मुख्य रस्त्यावर आल्याशिवाय होत नाही. इतक्या दाटीवाटीने या इमारती वसल्या आहेत. बहुसंख्य इमारती ३० ते ३५ वर्षे जुन्या असल्याने त्यांची अवस्था दयनीय आहे. अनेक इमारती जीर्ण आहेत. असे असतांनाही सामान्य माणूस तेथे जीव धोक्यात घालून राहत आहे. इमारत रिकामी केली तर बेघर होण्याची भिती असल्याने रहिवासी घर सोडत नाहीत. पालिकेकडून दरवर्षी येथील इमारतींना नोटिसा बजावल्या जातात. त्यानंतर स्ट्रक्चरल आॅडिटही करण्याची घोषणा होते. परंतु, त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे आहे. क्लस्टरसाठी (समूहविकास) पाठपुरावा केला जात आहे. परंतु, अद्यापही योजनेसाठी कालावधी जाणार आहे. पहिल्या टप्यात वागळे पटट््यातील किसनगर भागाचा समावेश करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत या भागाचा विकास करण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यानुसार आता आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. परंतु, प्रत्यक्षात क्लस्टरचे काम केव्हा सुरू होणार हे पालिकेलादेखील सांगणे शक्य नाही.

टॅग्स :thaneठाणे