शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

ठाण्यातील ७० उद्याने सुस्थितीत, ४० उद्यानांची करावी लागणार पूर्ण डागडुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 3:47 PM

ठाणे महापालिकेच्या उद्यान विभागाने केलेल्या सर्व्हेत शहरातील ७० उद्याने ही सुस्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे. तर ४० उद्यानांची पूर्णपणे डागडुजी करावी लागणार आहे. तसेच २० उद्यानांची किरकोळ दुरुस्ती करावी लागणार आहे.

ठळक मुद्देसर्व्हेत ७० उद्याने सुस्थितीतदुरुस्तीसाठी अंदाजे ५ कोटींचा खर्च अपेक्षित

ठाणे - शहरातील सर्वच उद्याने चांगल्या स्थितीत राहावीत, त्या उद्यानात देण्यात येणाऱ्या सोई, सुविधा उत्तम राहाव्यात या उद्देशाने ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पावले उचलली आहेत. त्यानुसार शहरातील या सर्वच उद्यानांचे सर्व्हे करुन त्याचा कृती आराखडा सादर करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या होत्या. परंतु महिना उलटूनही हा सर्व्हे झाला नव्हता. अखेर आता उद्यान विभागाकडून हा सर्व्हे पूर्ण झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील १३० पैकी ७० उद्याने ही उत्तम स्थितीत असल्याचा दावा करण्यात आला असून ४० उद्यानांची संपूर्ण डागडुजी करावी लागणार आहे. तर २० उद्यानांची किरकोळ डागडुजी करावी लागणार असल्याची माहिती उद्यान विभागाने सर्व्हेत नमुद केली आहे.                        ठाणे महापालिका हद्दीत छोटी - मोठी मिळून अशी १३० उद्याने आहेत. परंतु त्यातील हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच उद्याने चांगल्या स्थितीत असतील असा अंदाज बांधला जात होता. परंतु, उद्यान विभागाने केलेल्या सर्व्हेत तब्बल ७० उद्याने ही उत्तम स्थितीत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यात मोठ्या उद्यानांचाच अधिक समावेश असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. परंतु ४० उद्यानांची ही पुर्णपणे दैना उडाली असून या उद्यानांची १०० टक्के डागडुजी करावी लागणार असल्याचे या सर्व्हेत समोर आले आहे. त्यानुसार येथे थेट कपांऊड वॉल पासून नवीन खेळाचे साहित्य,पाण्याची सोय, विद्युत व्यवस्था, शौचालय आदी सर्वच सुविधा नव्याने निर्माण कराव्या लागणार आहेत. दरम्यान या उद्यानांना पुन्हा नवी झळाळी मिळावी या उद्देशाने ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर महिन्यात एक बैठक पार पडली होती. या बैठकीत शहरातील सर्व उद्याने, तलावालगत असलेली उद्याने, विकसित करण्यात आलेली हरित जनपथ आदी सुविधा नागरीकांना वापरण्यास अधिकाधिक चांगल्या पध्दतीने मिळावे यासाठी त्यांचे जतन करणे, निगा देखभाल करणे या दृष्टीने बांधकाम विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता, सर्व्हेअर, पाणी पुरवठा अभियंता, विद्युत अभियंता यांचे पथके नगर अभियंता यांच्या मार्फत तयार करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार या पथकांमार्फत सर्वेक्षण करावे व त्या आधारावर पुढील तीन महिन्यात सुधारणा करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा अशा सुचनाही देण्यात आल्या होत्या. परंतु त्याला चालनाच मिळाली नव्हती. अखेर उद्यान विभागाकडून त्यांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. आता यासाठी किती खर्च येणार याचा अंदाज बांधकाम विभागाला बांधवा लागणार आहे. परंतु पालिकेच्या सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या उद्यानांच्या दुरुस्तीसाठी साधारणपणे ५ कोटींच्या आसपास खर्च येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त