शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतून भेसळयुक्त खजूर, खारीकासह लवंगाचा सात काेटी २५ लाखांचा साठा जप्त

By जितेंद्र कालेकर | Updated: October 13, 2023 23:01 IST

अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई: महापे आणि तुर्भे एमआयडीसीमध्ये छापे

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: नवी मुंबईतील महापे एमआयडीसी, टीटीसी इंडस्ट्रीयल एरियामधील क्रिसेंट कोल्डस्टोरेज या कंपनीमध्ये छापा टाकून अन्न व औषध प्रशासन विभागाने तब्बल एक कोटी ७२ लाख ६२ हजारांचा ९५ हजार ३४ किलोचा भेसळयुक्त खजूर आणि खारीक  तसेच तुर्भे  भागातून पाच कोटी ५५ लाख सहा हजार ८५० रुपयांचा भेसळयुक्त लवंगाचा साठा असा सात काेटी २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या अन्न पदार्थाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्याच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन कोकण विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी शुक्रवारी दिली.

देशमुख यांच्याच मार्गदर्शनाखाली निर्भेळ, सकस आणि सुरक्षित अन्न पदार्थाची साठवणूक तसेच विक्री होते किंवा नाही, याच्या तपासणीची विशेष मोहीम या विभागाने सुरु केली आहे. अशीच कारवाई नवी मुंबईतील महापेमधील मे. क्रिसेंट कोल्डस्टोरेज प्रा. लि शितगृहामध्ये १० ऑक्टाेंबर २०२३ रोजी झाली. याच तपासणीमध्ये याठिकाणी खजूर आणि खारीक या अन्न पदार्थाचे दहा नमुने घेऊन त्यांचा एक कोटी ७२ लाख ६२ हजारांचा ९५ हजार ३४ किलोचा संशयास्पद भेसळयुक्त साठा जप्त केला. अन्नपदार्थाच्या लेबलवर अन्न  सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत आवश्यक व बंधनकारक लेबल मजकुरही नव्हता. या अन्न पदार्थाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यिात आले आहेत.

दरम्यान, नवी मुंबईतल्याच तुर्भे एमआयडीसीतील टीटीसी इंडस्ट्रीयल एरियामधील मेसर्स मयुर कोल्डस्टोरेज प्रा. लि. या शीतगृहाचीही ११ ऑक्टाेंबर रोजी तपासणी करण्यात आली. यामध्ये लवंग कांडीचे दहा नमुने घेण्यात आले. त्यांचाही पाच कोटी ५५ लाख ६ हजार ८५० रुपयांचा दोन लाख ४६ हजार ४०७ किलोचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला.या अन्नपदार्थाच्या लेबलवरही अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत आवश्यक व बंधनकारक मजकुराचा लेबल नव्हता. ही कारवाई सहायक आयुक्त गौरव जगताप, व्यंकट चव्हाण, योगेश ढाणे आणि  दिगंबर भोगावड आदींच्या पथकाने केली. 

टॅग्स :thaneठाणे