शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिका हद्दीत ६४ शाळा अनाधिकृत, इंग्रजी माध्यमाच्या ५१ शाळांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 17:51 IST

ठाणे महापालिकेने जाहीर केलेल्या शहरातील अनाधिकृत शाळांच्या यादीत तब्बल ६४ शाळांचा समावेश असून यामध्ये इंग्रजी शाळांचा आकडा हा चढा असल्याचे स्पष्ट झाले. या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका असे आवाहन शिक्षण विभागाने केले असले तरी येथे शिक्षण घेत असलेल्या १० हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य मात्र अधातंरी आले आहे.

ठळक मुद्दे४९७ शिक्षकांवर देखील बेकारीची पडणार कुऱ्हाड अनाधिकृत शाळेत प्रवेश न घेण्याचे आवाहन

ठाणे - ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या अनाधिकृत शाळांच्या यादीचा आकडा यंदा वाढला आहे. त्यानुसार महापालिका हद्दीत तब्बल ६४ शाळा या अनाधिकृत असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या तब्बल ५१ शाळा असून मराठी माध्यमाच्या ३ आणि हिंदी माध्यमाच्या १० शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये आजच्या घडीला १० हजार २६३ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांचे भवितव्य मात्र धोक्यात आले आहे. तर या शाळांमध्ये ४९७ शिक्षक हे शिक्षण देण्याचे काम करीत असून त्यांच्यावर देखील बेकारीची कुऱ्हाड  येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.        ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी शहरातील अनाधिकृत शाळांची यादी प्रसिध्द केली जाते. या शाळांमध्ये पाल्यांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवू नये असे देखील सांगितले जाते. परंतु यातील काही शाळा या मागील वर्षीच्या यादीत देखील होत्या. आता पुन्हा त्या शाळांचा समावेश देखील पुन्हा करण्यात आला आहे. महापालिका हद्दीत अशा आताच्या घडीला ६४ शाळा असून यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा आकडा अधिकचा असलेला दिसून येत आहे. सध्या इंग्रजी शाळांना चांगली मागणी असल्याने नावजलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रत्येक पाल्याला आपल्या मुलाला टाकणे शक्य होत नाही, त्यामुळे याचाच फायदा घेत झोपडपट्टी भागात अशा शाळांचे प्रमाण वाढत असल्याचे मुख्य कारण असू शकते असा कयास शिक्षण विभागाने लावला आहे.त्यातही या शाळा कळवा, राबोडी, दिवा, वागळे इस्टेट, मुंब्रा आदी भागातच या शाळांचा आकडा अधिक असल्याचे दिसून आले आहे. खास करुन दिव्यात या अनाधिकृत शाळांचा आकडा अधिकचा असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या यादीतून स्पष्ट होत आहे. त्यानुसार या भागात इंग्रजी माध्यमाच्या ५१ शाळा असून मराठी माध्यमाच्या ३ आणि ंिहदी माध्यमाच्या १० शाळांचा समावेश आहे. या सर्व शाळांमधून तब्बल १० हजार २६३ विद्यार्थी शिक्षण घेण्याचे कार्य करीत असून त्यांना शिकविण्यासाठी ४९७ शिक्षक सज्ज आहेत. परंतु या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना टाकू नये असे आवाहन ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने केले असून या शाळांदेखील दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाSchoolशाळा