शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

खोटं बक्षीसपत्र बनवणा-या मुलावर गुन्हा नोंदवण्याची ६२ वर्षीय पित्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 21:07 IST

मालमत्ता कर आकारणी पालिकेच्या संगनमताने स्वत:च्या नावे केल्याने त्याच्यासह पालिका आयुक्त व संबंधितांवर गुन्हा दाखल करा, अशी तक्रार खुद्द वडिलांनीच कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आदींकडे केली आहे.

मीरा रोड - आपल्या मुलाने खोट्या सह्या करून बनावट बक्षीसपत्र बनवून महापालिका अधिका-यांच्या संगनमताने राहत्या घराच्या निम्म्या जागेची मालमत्ता कर आकारणी पालिकेच्या संगनमताने स्वत:च्या नावे केल्याने त्याच्यासह पालिका आयुक्त व संबंधितांवर गुन्हा दाखल करा, अशी तक्रार खुद्द वडिलांनीच कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आदींकडे केली आहे. घोडबंदर गावातील गोवळा देव मंदिराजवळच्या गौरीशंकर चाळीत ६२ वर्षांचे जुलकदर मोहम्मद टकी शेख हे कुटुंबीयांसह राहतात. घर हे त्यांच्या आई रशीदाबाई यांच्या नावे असून, त्यांचे ३० वर्षां पुर्वी निधन झाले आहे. पण पालिकेच्या मालमत्ता कर नोंदी रशिदाबाई यांचेच नाव आहे. पानपट्टी चालवणारे जुलकदर यांचे भाऊ - बहीण वारले असले तरी त्यांची मुलं आदी वारस आहेत.तसे असताना मुलगा महमद शरीफ याने खोट्या सह्या करून आॅक्टोबर २०१७ मध्ये बक्षिसपत्र बनवून घेतले व ते ए कलाम खान या वकिलाकडून नोटरी करून घेतले. त्यात वडील जुलकदर हे त्यांची आई रशिदा यांचे कायदेशीर वारस असल्याचे व राहत्या घरापैकी ३०० चौ. फुट जागा मुलगा मोहमद शरीफ याला बक्षीस म्हणून दिल्याचे म्हटले आहे.शिवाय घराच्या हिश्श्यास नवीन कर आकारणी करण्यापासून स्वतंत्र वीज मीटर, फोटोपास, शिधावाटप पत्रिका, मतदान ओळखपत्र आदी शरीफच्या नावे करण्यास वडिलांची हरकत नसल्याचे नमूद केले. त्यात साक्षीदार म्हणुन नातलग रशिदा व परिचीत अरविंद सिंग यांची नावं आहेत. बक्षीसपत्राच्या आधारे पालिकेने शरीफच्या नावे नवीन कर आकारणी मंजूर केली. जुलकदर यांना सदर बाब समजताच त्यांनी पालिकेतून कागदपत्रं मिळवत ४ आॅगस्ट रोजी आयुक्त व कर निर्धारक संकलक यांना भेटून आपल्या मुलाने बनावट बक्षीसपत्राच्या आधारे पालिका अधिका-यांशी संगनमत करून नवीन कर आकारणी करून घेतल्याची तक्रार केली. पण पालिकेकडून काहीच कारवाई न झाल्याने आता जुलकदर यांनी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यासाठी साकडं घातलं आहे.

टॅग्स :mira roadमीरा रोड