शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

घराचा हप्ता ६० हजार, पाण्याकरिता महिन्याला १० हजार, घोडबंदरमधील गृहसंकुलांना बारा महिने टँकर

By अजित मांडके | Updated: September 15, 2023 07:50 IST

Thane: घोडबंदर रोड म्हणजे ठाण्यातील अपमार्केट डेस्टिनेशन. इथल्या कॉम्प्लेक्समध्ये स्वीमिंग पूल, जिम, प्ले स्कूल सगळं काही आहे. फ्लॅटची किंमत ७० ते ९० लाख. निसर्गरम्य परिसरातील या फ्लॅटला चोवीस तास पाणी मिळेल असा दावा बिल्डरनी केला होता. प्रत्यक्षात महिनाभरात तासभर पाणीपुरवठा होत असल्याचे दिसून आले.

- अजित मांडकेठाणे - घोडबंदर रोड म्हणजे ठाण्यातील अपमार्केट डेस्टिनेशन. इथल्या कॉम्प्लेक्समध्ये स्वीमिंग पूल, जिम, प्ले स्कूल सगळं काही आहे. फ्लॅटची किंमत ७० ते ९० लाख. निसर्गरम्य परिसरातील या फ्लॅटला चोवीस तास पाणी मिळेल असा दावा बिल्डरनी केला होता. प्रत्यक्षात महिनाभरात तासभर पाणीपुरवठा होत असल्याचे दिसून आले. आता दररोज २२०० रुपये भरून टँकरने पाणी मागवणे सुरू झाले. दिवसाला दोन टँकर लागतात. घराचा हप्ता ५५ ते ६० हजार रु. पाण्याकरिता महिन्याला किमान ८ ते १० हजार रुपये लागतात. आंघोळीलाच पाणी नाही तर स्वीमिंग पूलला कुठून आणायचे? त्यामुळे तो बंद केल्याचे अनेकांनी सांगितले. 

ठाणे स्टेशनपासून २० मिनिटांत घरी पोहोचणार, अशी जाहिरात बिल्डरने केली. मात्र पिक अवरला स्टेशन ते घर हे अंतर कधीही पाऊण ते एक तासापेक्षा कमी वेळात पूर्ण झाले नाही. दोन वर्षांत आजूबाजूला आमच्या टॉवर इतकेच किंवा त्यापेक्षा जास्त उंच टॉवर उभे राहिल्याने निसर्ग औषधाला उरलेला नाही. 

टँकर माफिया जोरात- प्रत्येक सोसायटीत पाणी पोहोचवितांना टँकरवाल्यांचे रेट वेगवेगळे आहेत. महापालिकेकडून टँकर घेतल्यास पहिला टँकर मोफत दिला जातो. - दुसरा टँकर लागल्यास ७०० रुपये आकारले जातात. टँकर माफिया त्यासाठी १२०० ते २००० रु. आकारतात. - एका गृहसंकुलाचे टँकरचे बिल महिनाकाठी ६० हजार ते १ लाखापर्यंत येते, असे रहिवाशांनी सांगितले.- घोडबंदरच्या पाणी समस्येसाठी भाजपचे आ. संजय केळकर यांनी चळवळ उभी केली. परंतु काहीच फरक पडलेला नाही.  

लोक काय म्हणतात... कासारवडवली भागात असलेल्या विजय पार्क या ८७० रहिवाशांच्या गृहसंकुलाला रोज दिवसातून ८ ते १० वेळा वीज पुरवठा खंडित होतो.     - रवींदर यादव, रहिवासी अनेक भागात अंतर्गत रस्त्यांची वाट लागली आहे. मोघरपाड्याकडे जाणाऱ्या कारशेड रस्त्याची अवस्था वाईट आहे. पावसाळ्यात चालणे मुश्किल होते. - अजय शर्मा, रहिवासी

पावसाळ्यातही आमच्या सोसायटीला टँकरनेच पाणी पुरवठा होतो. किमान पाणी तरी मिळावे एवढी अपेक्षा आहे.- दीपक पांचाळ, रहिवासी

घोडबदंर भागातील पाण्याची समस्या पहिल्यासारखी राहिलेली नाही. आता पुरेसे पाणी येथील सदनिकाधारकांना मिळत आहे. विकासकांनीच या भागात सहा जलकुंभ उभारुन दिलेले आहेत. तसेच ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्याठिकाणी महापालिकेने सांगितल्यानंतर जलवाहिन्या टाकण्याचे कामही केले आहे. - जितेंद्र मेहता, विकासक

nसात ते आठ वर्षांत घोडबंदर भागाचा झपाट्याने विकास झाला. nमेट्रोचे काम सुरू आहे. नवनवीन गगनचुंबी गृहसंकुले उभी राहत आहेत.  nवीज पुरवठा वरचेवर खंडित होणे हे आता नित्याचे झाले आहे. nभीषण पाणीटंचाई, पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रचंड वाहतूककोंडी,  रखडलेल्या पादचारी पुलांमुळे होणारे अपघातही वाढत आहेत.  nघोषणा होऊनही पाणी पुरवठ्यात वाढ झाली नाही. n३५० च्या आसपास इमारतींना पाणी टंचाई सहन करावी लागते. nसकाळी टँकरची मागणी केली तर त्याच दिवशी तो मिळेल, याची खात्री नाही. 

टॅग्स :thaneठाणे