शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रवाशांना लुटणारे ६० टक्के तृतीयपंथी स्त्रीवेशातील पुरुष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 03:02 IST

लग्नसराई अथवा मंगलसमयी अनेक समाजांत तृतीयपंथीयांना बोलावून त्यांच्याकडून शुभाशीर्वाद घेतले जात असले, तरी दुसरीकडे याच तृतीयपंथीयांच्या रेल्वेप्रवासातील वाढत्या उपद्रवामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.

- पंकज रोडेकरठाणे : लग्नसराई अथवा मंगलसमयी अनेक समाजांत तृतीयपंथीयांना बोलावून त्यांच्याकडून शुभाशीर्वाद घेतले जात असले, तरी दुसरीकडे याच तृतीयपंथीयांच्या रेल्वेप्रवासातील वाढत्या उपद्रवामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. रेल्वेस्थानकात आरपीएफ अथवा रेल्वे पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईच्या वेळी अनेक तृतीयपंथी धावत्या लोकलमधून उतरून पटरीतून धावत सुटतात. मात्र, तरीही ठाणे आरपीएफने मागील चार वर्षांत सुमारे ९३७ तृतीयपंथीयांवर कारवाई केली आहे. यात पकडलेल्या तृतीयपंथीयांपैकी ६० टक्के तृतीयपंथी स्त्रीवेशातील पुरु ष असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली.मुंबई उपनगरीय रेल्वेबरोबरच मेल-एक्स्प्रेसमध्ये तृतीयपंथीयांची गेल्या काही दिवसांपासून वर्दळ वाढू लागली आहे. त्यांच्या अश्लील हावभाव करण्याच्या सवयीमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. महिलांच्या डब्यात जाऊन पैसे मागण्याची जुनी पद्धत असली, तरी आता जनरल डब्यातही त्यांचे प्रस्थ हळूहळू वाढत आहे. त्यातच, रेल्वेस्थानकात आरपीएफ कारवाई करत असल्यामुळे लोकल-मेल-एक्स्प्रेसमधून प्रवाशांकडून पैसे गोळा केल्यानंतर स्थानक येण्याअगोदर ही मंडळी चालत्या गाडीतून उतरते. अनेक तृतीयपंथी रेल्वे पटºयांमध्ये धावण्यात माहीर आहेत.त्यामुळे पटरीतून त्यांना पकडणे काहीसे अवघड जात असले, तरी आरपीएफकडून राबवल्या जाणाºया विशेष मोहिमेत अनेक तृतीयपंथी जाळ्यात अडकतात. मागील चार वर्षांत ठाणे आरपीएफने ९३७ तृतीयपंथीयांंवर कारवाई करून न्यायालयात हजर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.पोटाची खळगी भरण्यासाठी मार्गतृतीयपंथीयांची कटकट नको म्हणून प्रवासी त्यांना पैसे देतात. दिवसभरात चांगली कमाई होत असल्याने आता स्त्रीवेशातील पुरुष तृतीयपंथीयांची संख्या वाढते आहे. नोकरी-व्यवसाय नसल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक पुरु ष हे तृतीयपंथीयांचा वेश करून भटकत असतात. ठाणे आरपीएफने ठाणे ते कल्याणदरम्यान केलेल्या कारवाईत तब्बल ६० टक्कयांहून अधिक तृतीयपंथी स्त्रीवेशातील पुरु ष असल्याचे सांगण्यात आले.>एक्स्प्रेसमधल्या प्रवाशांशी गैरवर्तनरेल्वे कायद्याचे उल्लंघन करणाºया तृतीयपंथीयांवर कारवाई करण्यात येते. सर्वाधिक मेल-एक्स्प्रेसमधल्या प्रवाशांशी गैरवर्तन करणाºया तृतीयपंथीयांना अटक करण्यात आली आहे. ते एलटीटी (लोकमान्य टिळक टर्मिनल) येथून सुटणाºया मेल-एक्स्प्रेस अथवा कल्याण स्थानकात चढून मुंबईकडे जाणाºया गाड्यांमध्ये बसतात. अप आणि डाउन मार्गांवरील बहुतांशी गाड्या ठाणे खाडीपुलावर सावकाश धावतात. याचाच फायदा घेऊन ते चालत्या गाडीतून उतरताना दिसून येतात. कारवाईत पकडलेल्या तृतीयपंथीयांकडून ५०० ते १५०० रु पये दंड वसूल केला जात असून आतापर्यंत ज्यांनी दंड भरला नाही, अशा १० टक्के तृतीयपंथीयांना जेलची हवा खावी लागली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.>भीक मागून प्रवाशांना नाहक त्रास देणाºयांविरोधात भारतीय रेल्वे अ‍ॅक्टनुसार कारवाई केले जाते. त्यानुसार, या वर्षातील जानेवारी ते आॅगस्ट या कालावधीत ठाणे-कल्याणदरम्यान ९३४ तृतीयपंथीयांवर कारवाई केली आहे. तर, नुकत्याच दाखल झालेल्या एका गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ही कारवाई आणखी तीव्र केली आहे.- राजेंद्र पांडव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे आरपीएफ