शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

५८ हजार नागरिक होम क्वारंटाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 12:04 AM

कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक २३ हजार ७५८ संशयित रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढू लागला आहे. परंतु, यामध्ये कोणतीही लक्षणे नसलेले, सौम्य लक्षणे असलेल्यांची संख्या अधिक आहे. मात्र, रुग्णांच्या संपर्कात असलेले, तसेच प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळेच आजघडीला ठाणे  जिल्ह्यात तब्बल ५८ हजार नागरिक होम क्वॉरंटाईन असून, त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. परंतु, रुग्णांच्या संपर्कातील लोकांची संख्याही काही प्रमाणात वाढत असून, यामध्ये कल्याण डोंबिवलीतील सर्वाधिक २३ हजार ७५८ नागरिकांचा समावेश आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत होती. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागासह महसूल विभागातील कर्मचारी, पोलीस प्रशासन अहोरात्र कार्यरत होते. तरीही रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. रुणालयातील बेड्सदेखील अपुरे पडत होती. त्यामुळे बेड्सअभावी रुग्णांचे होणारे हाल या सर्व बाबींचा विचार करता आरोग्य विभागाने उपाययोजना केल्या. त्यानुसार सौम्य लक्षणे आढळणारे रुग्ण, ज्यांना त्रास होत नसेल अशा नागरिकांना आरोग्य विभाग होम क्वारंटाईनचा सल्ला देत होता. त्यावेळी होम क्वारंटाईन रुग्णांची संख्या लाखोंच्या घरात गेली होती. 

खासदार शिंदे यांना कोरोनाची लागणकल्याण : कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. खा. शिंदे यांनाही त्रास जाणवू लागल्यावर त्यांनी चाचणी केली असता, अहवाल पॉझिटिव्ह आला. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी उल्हास नदी प्रदूषणाच्या आंदोलनास भेट दिली होती. त्यावेळी पालकमंत्र्यांसह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.