शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी प्रांत कार्यालयातील ५८ लाख फसवणूक प्रकरण; आणखी तिघांना अटक, आरोपींची संख्या सहावर 

By नितीन पंडित | Updated: November 23, 2022 17:49 IST

अटक झालेल्या आरोपींची संख्या सहावर.

मुंबई वडोदरा महामार्गात मयत जमीन मालकाचा भूसंपादीत जमिनीचा मोबदला फसवणूक करून बळकावल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात शांतीनगर पोलिसांनी आणखी तीन आरोपींना मंगळवारी अटक केली आहे. त्यामुळे अटक झालेल्या आरोपींची संख्या सहावर पोहचली आहे. अटक झालेल्या आरोपींमध्ये दुगाड गावच्या सारपंचाचेही नाव आले आहे. राजेश वाल्या भोईर असे अटक सरपंचाचे नाव असून त्यासोबत मोहमद तहा अनीस मोमीन, मोहमद अमीन अनीस मोमीन या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.  

या बाबत शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विक्रमसिंह मोहिते यांनी सांगितले की,या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक केली असता त्यांच्या चौकशीत जी नावे समोर आली त्यानुसार दुगाड ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश वाल्या भोईर यांनी भागीरथी मुकणे मयत ठकी सवर हीच्या नावाचा बोगस रहीवाशी दाखला दिला आहे. मोहमद तहा अनीस मोमीन याने बनावट आधारकार्ड बनवण्यासाठी केलेल्या प्रतिज्ञापत्रावर मयत ठकी सवर हीस ओळखतो म्हणून सही केली आहे. तर आरोपी मोहमद अमीन अनीस मोमीन याने गॅझेट बनवून बनावट आधार कार्ड काढून दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने शांतीनगर पोलिसांनी या तिघांना फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. 

या तिन्ही आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या तिन्ही आरोपींना २५ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे अशी माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विक्रमसिंह मोहिते यांनी दिली. या गुन्ह्याची व्याप्ती पाहता अजूनही आरोपी पोलिसांच्या रडारवर असल्याने आरोपींच्या गोटात खळबळ माजली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी