शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

मीरा-भार्इंदरमधून ५२ किलो पिशव्या जप्त, पिशव्यांची दिवसरात्र खुलेआम विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:32 IST

कायद्याने बंदी असूनही शहरात सर्रास प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर होत असतानाच आता मीरा- भार्इंदर प्लास्टिक बॅग मर्चंट असोसिएशनने दिलेल्या माहितीनंतर महापालिकेने ३ विक्रेत्यांकडून १५ हजार दंड वसूल करत ५२ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. कायद्याने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी असून आरोग्यास तसेच पर्यावरणास त्या घातक आहेतच शिवाय पावसाळ्यात याच पिशव्यांमुळे पूरस्थिती निर्माण होण्याचे प्रकार घडतात. तसे असताना शहरात सर्रास पातळ पिशव्यांची दिवसरात्र खुलेआम विक्री व वापर केला जातो. महापालिका प्रशासन मात्र या प्लास्टिक माफियांना पाठीशी घालत असून थातूरमातूर कारवाईचे नाटक करते.

मीरा रोड : कायद्याने बंदी असूनही शहरात सर्रास प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर होत असतानाच आता मीरा- भार्इंदर प्लास्टिक बॅग मर्चंट असोसिएशनने दिलेल्या माहितीनंतर महापालिकेने ३ विक्रेत्यांकडून १५ हजार दंड वसूल करत ५२ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत.कायद्याने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी असून आरोग्यास तसेच पर्यावरणास त्या घातक आहेतच शिवाय पावसाळ्यात याच पिशव्यांमुळे पूरस्थिती निर्माण होण्याचे प्रकार घडतात. तसे असताना शहरात सर्रास पातळ पिशव्यांची दिवसरात्र खुलेआम विक्री व वापर केला जातो. महापालिका प्रशासन मात्र या प्लास्टिक माफियांना पाठीशी घालत असून थातूरमातूर कारवाईचे नाटक करते.पालिकेकडून ठोस कारवाई होत नसतानाच आता खुद्द मीरा- भार्इंदर प्लास्टिक बॅग मर्चंट असोसिएशननेच पिशव्यांविरोधात कारवाईसाठी पुढाकार घेतला आहे. संस्थेचे सुकेतू नानावटी व अन्य पदाधिकारी आदींनी कायद्याने बंदी असताना प्लास्टिक पिशव्या विकणाºयांची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागास देण्यास सुरूवात केली आहे. त्या अनुषंगाने बुधवारी संस्थेचे पदाधिकारी व स्वच्छता निरीक्षक अनिल राठोड यांनी क्विन्स पार्क व परिसरातील राकेश शाह यांच्या जे. आर.पॅकेजरी, मुकेश चौधरी यांच्या रॉयल कलेक्शन व ओमप्रकाश पटेल यांच्या दुकानांमध्ये छापा टाकून सुमारे ५२ किलो बंदी असलेल्या पिशव्या जप्त केल्या.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक