शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात ५,१०,३०१ मतदार बाद; आता ६४ लाख मतदारांची अंतिम मतदार यादी निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 23:38 IST

जिल्ह्यातील पाच लाख 10 हजार 301 मतदार स्थलांतरीत झालेले, छायाचित्र नसल्याच्या कारणांखाली मतदार यादीतून वगळ्यात आले आहे. आता जिल्ह्यात यामध्ये नव्याने एक लाख 70 हजार 699 मतदारांची नोंदणी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यातील पाच लाख 10 हजार 301 मतदार स्थलांतरीत झालेले, छायाचित्र नसल्याच्या कारणांखाली मतदार यादीतून वगळ्यात आले आहे. आता जिल्ह्यात यामध्ये नव्याने एक लाख 70 हजार 699 मतदारांची नोंदणी झाली आहे. या नवीन मतदारांसह जिल्ह्यात आता 64 लाख 66 हजार 798 मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आल्याचे ठाणो जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या 1 जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रंसह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्र मांनुसार मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी आता करण्यात आली आहे.  जिल्ह्यामध्ये विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्र मा पूर्वी व विशेष संक्षिप्त कार्यक्र मानंतर आता ठाणो जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण (जेंडर रेशिओ) 841 वरून 843 झाले आहे. यासह 5 जानेवारीच्या प्रसिध्द अंतिम मतदार यादीत जिल्ह्यात 64 लाख 66 हजार 798 मतदार आहेत. त्यात महिला मतदारांची संख्या  29 लाख 57 हजार 14 तर पुरूष मतदारांची संख्या 35 लाख 9 हजार 42 आहे. दरम्यान, मतदार नोंदणी कार्यक्र मात एक लाख 70 हजार 699 एवढय़ा मतदारांची वाढ झाली आहे. त्यामध्ये महिला 81 हजार 676 तर पुरूष 88 हजार 784 आहेत व इतर मतदारांची संख्या 239 नोंद झाली आहे.जिल्ह्यात गेल्या वर्षी 1 जानेवारी रोजी मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेले आठ लाख 35 हजार 508 मतदार होते. मागील एक वर्षामध्ये कोरोना सदृश्य परिस्थिती असताना देखील जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी कार्यालयमधील अधिकारी, कर्मचारी, बीएलओंच्या प्रयत्नाने स्थलांतरीत झालेल्या व छायाचित्र नसलेल्या पाच लाख 10 हजार 301 इतक्या मतदारांची वगळणी करण्यात आली आहे. महानगरपालिका,नगर परिषद व नगर पंचायत यांच्या निवडणूकीसाठी जास्तीत जास्त मतदार नोंदणी व्हावी यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी यांनी प्रभावी अमंलबजावणीचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी नार्वेकर यांनी ठाणो जिल्ह्यातील नवी मुंबई, कल्याण डोंबिवली येथील राजकीय पक्षांची बैठक घेवून त्यांना जास्तीत जास्त मतदार नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्र मा दरम्यान सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये नवमतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम, नवीन गृहनिर्माण सोसायटी, वंचित महिला, तृतीयपंथी, आदीवासी पाडे, मोठमोठ्या औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठका जिल्हास्तरावर घेण्यात आल्या होत्या.

टॅग्स :thaneठाणे