सदानंद नाईक -उल्हासनगर: एकेकाळी 'सिंधींचे शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उल्हासनगरात मराठी भाषिक नगरसेवकांनी ५० टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे. एकूण ७८ जागांपैकी ३९ जागांवर मराठी नगरसेवक निवडून आल्याने, आता मुंबईच्या धर्तीवर उल्हासनगरमध्येही मराठी महापौराची मागणी जोर धरू लागली आहे.
फाळणी वेळी विस्थापित झालेल्या सिंधी समाजाला कल्याण शेजारील ब्रिटिशकालीन लष्करी छावणी व खुल्या जागेत वसविण्यात आले. शहरा जवळून वाहणाऱ्या उल्हास नदीवरून या विस्थापिताच्या छावणीला उल्हासनगर हे नाव मिळाले. आजही शहराच्या संस्कृतीवर सिंधी समाजाचा मोठा प्रभाव असलातरी, गेल्या काही वर्षांत लोकसंख्येचे गणित वेगाने बदलले आहे. सिंधी कुटुंबे चांगल्या सुविधांच्या शोधात ठाणे, कल्याण आणि अंबरनाथ यांसारख्या शहरांकडे स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे त्यांची संख्या घटत असताना मराठी आणि उत्तर भारतीय समाजाची लोकसंख्या वाढली आहे.
पक्षनिहाय आणि समाजवार बलाबल.महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर ऐकून ७८ पैकी ३९ मराठी म्हणजे ५० टक्के मराठी नगरसेवक निवडून आले. तर सिंधी समाजाचे २९ म्हणजे ३७ टक्के सिंधी समाजाचे नगरसेवक निवडून आले. शीख व उत्तरभारतीय-बंगाली नगरसेवकांची संख्या प्रत्येकी ५ आहे.
शिंदेसेना व ओमी टीम- ३६ जागा शिंदेसेना व ओमी टीमचे ऐकून ३६ नगरसेवक निवडून आले असून ३६ पैकी २२ नगरसेवक मराठी आहेत. ८ सिंधी, ४ शीख आणि उत्तरभारतीय व बंगाली समाजाचे नगरसेवक आहेत.
भाजप -३७ जागा भाजपच्या ऐकून ३७ नगरसेवका पैकी सिंधी समाजाचे सर्वाधिक २० नगरसेवक आहेत, तर १३ मराठी, १ शीख आणि ३ उत्तर भारतीय/बंगाली नगरसेवक आहेत.
इतर -५ जागा जे इतर ५ नगरसेवक निवडून आलेत त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी-२, काँग्रेस-१ आणि अपक्ष-१ हे सर्व ४ नगरसेवक मराठी आहेत, तर साई पक्षाचा १ नगरसेवक सिंधी समाजाचा आहे.
मराठी महापौराची मागणी उल्हासनगरच्या इतिहासात सिंधी समाजाचे राजकारणावर वर्चस्व राहिले आहे. मात्र, आता निम्मे नगरसेवक ३९ मराठी असल्याने, ज्याची संख्या जास्त, त्याचा महापौर हा नियम लागावा, अशी भावना स्थानिक मराठी नेत्यांची व मराठी समाजाची आहे. मुंबई महापालिकेत ज्याप्रमाणे मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी असतो, तसेच वातावरण आता उल्हासनगरमध्येही दिसू लागले आहे.
Web Summary : Ulhasnagar sees a rise in Marathi councilors (50%), challenging traditional Sindhi dominance. Demands for a Marathi mayor are growing, mirroring Mumbai's political landscape. Changing demographics fuel this shift.
Web Summary : उल्हासनगर में मराठी पार्षदों (50%) की संख्या बढ़ी, जिससे सिंधी प्रभुत्व को चुनौती मिली। मुंबई की तरह मराठी महापौर की मांग बढ़ रही है। बदलती जनसांख्यिकी इस बदलाव को बढ़ावा दे रही है।