ठाणे : कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला, काटकसरीचा, मुहसुली उत्पन्न वाढविण्यावर भर, खर्चामध्ये वित्तीय शिस्त, महिला, जेष्ठ नागरीक व युवा यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांवर भर, भांडवली कामांतर्गत हाती घेतलेली कामे पूर्ण करण्याचे नियोजन, प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता व कार्यक्षमता वाढविण्यावर भर आणि शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामांचा दर्जा उत्तम राहावा याकडे विशेष लक्ष देणारा ठाणे महापालिकेचा २०२४-२५ चा ५०२५ कोटी १ लाख रुपयांचा अर्थसंकल्प ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सादर केला.
यात महिला सक्षमीकरणावर भर देण्याबरोबरच आरोग्य व्यवस्था मजबुत करण्यावर भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गुरुवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात महसुली खर्च ३३४५ कोटी ६६ लाख, भांडवली खर्च १६७९ कोटी, अखेरची शिल्लक ३५ लाख असा एकूण ५०२५ कोटी १ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. २०२३ -२४ मध्ये ४३७० कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यात यंदा सुमारे ६५५ कोटींची वाढ दिसून आली आहे. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात पाणी पुरवठा आकार, अग्निशमन दल, जाहीरात, स्थावर मालमत्ता आदी विभागांच्या उत्पन्नात घट येत असली तरी देखील शहर विकास विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यामुळे महसुली उत्पन्न ३१६० कोटी १६ लाखांऐवजी ३०९२ कोटी ३९ लाख सुधारीत करण्यात आले आहे.
महापालिकेने अपेक्षित केलेल्या ४६० कोटी ५ लाखांच्या अनुदानात ६९७ कोटी ९८ लाख वाढ होत असून सुधारीत अर्थसंकल्पात अनुदानापोटी ११५८ कोटी ३ लाख अनुदान अपेक्षित धरण्यात आले आहे. तर डिसेंबर २०२३ अखेर ९८९ कोटी २९ लाख अनुदान प्राप्त झाले आहे. प्राप्त झालेल्या अनुदानातील अर्खचित रकमा २०२३-२४ च्या आरंभिच्या शिल्लकेमध्ये समाविष्ट आहेत. खर्चात २०२३-२४ मध्ये महसुली खर्च २७०८ कोटी ८३ लाख अपेक्षित केला होता. तो सुधारीत अर्थसंकल्पात २६७२ कोटी ७९ लाख अपेक्षित असून भांडवली खर्च १६६० कोटी ९१ लाख ऐवजी भांडवली अनुदानात वाढ झाल्याने तो २०४९ कोटी ४३ लाख सुधारीत करण्यात आले आहे. यात अतिरिक्त खर्च करणे टाळण्यात आले असून भांडवली खर्चावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
अर्थसंकल्पातील प्रमुख उद्दीष्टेकोणतीही करवाढ व दरवाढ नाही, महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर, खर्चात वित्तीय शिस्त, महिला, जेष्ठ नागरीक व युवा यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांवर भर, भांडवली कामांतर्गत हाती घेतलेली कामे पूर्ण करण्याचे नियोजन, प्रशासकीय कामाकाजात पारदर्शकता, कामांचा दर्जा उत्तम राहण्यावर भर आदी प्रमुख उद्दीष्टे ठेवण्यात आली आहेत.
मालमत्ता कराच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्नमालमत्ता कर हा महापालिकेचा प्रमुख उत्पन्नाचे स्त्रोत आहे. त्यानुसार २०२३-२४ मध्ये ७६१ कोटी ७२ लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. डिसेंबर अखेर ४८१.३६ कोटी उत्पन्न आल्याने या करापासून ७३८ कोटी ७१ लाख सुधारीत करण्यात आले आहे. या कराची वसुली करण्यासाठी सवलत योजना देखील राबविण्यात आली होती. मालमत्ता करावरील शास्ती व व्याज माफीचा लाभही करदात्यांना झाला. तर २०२४ -२५ मध्ये मालमत्ता कर ८१९ कोटी ७१ लाख अपेक्षित धरण्यात आले आहे. तसेच वाढीव मागणी व त्यातून वाढणाºया उत्पन्नातील भागिदारी तत्वावर मालमत्तांचा जीआयएस सर्व्हे व त्यातून वाढ, मालमत्ता कराचा डेटा हा इतर विभागाच्या डेटा सोबत तुलनात्मक पुनर्पडताळणी करणे, त्यातून मालमत्ता कराचा डेटा सुधारीत होऊन मालमत्ता कराच्या मागणीत वाढ होणार आहे.
शहर विकास विभागुरवठाशहर विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात ५६५ कोटींचे उद्दीष्ट होते. परंतु उद्दीष्टापेक्षा अधिकची वसुली या विभागाने केली आहे. त्यानुसार २०२४-२५ च्या आर्थिक वर्षात हे उद्दीष्ट ७५० कोटी अपेक्षित धरण्यात आले आहे.
स्थानिक संस्था करस्थानिक संस्था कर अनुदानातून १०५७ कोटी ७९ लाख, मुंद्राक शुल्क अधिभारापोटी २०० कोटी, स्थानिक संस्था कराची मागील वसुली १० कोटी असे एकूण १२६७ कोटी ७९ लाख उत्पन्न अपेक्षित होते. तर २०२४-२५ या वर्षात अनुदानापोटी ११४२.४२ कोटी, मुंद्राक शुल्क अधिभारापोटी २०० कोटी, स्थानिक संस्था कराची मागील वसुली ८ कोटी असे १३५०.४२ कोटी उत्पन्न अपेक्षित.
पाणी पुरवठा विभागाची वसुली चिंतेची बाबपाणी पुरवठा विभागाला २२५ कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. परंतु ६३.७६ कोटींची वसुली झाली असल्याने यंदा २२५ कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. तर पाणी बिलाची वसुली करण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्याबरोबर नळ संयोजन खंडीत करण्यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय अनाधिकृत मालमत्तावंर शास्ती कर लावून मालमत्ता आणि पाणी बिलाची वसुली देखील त्याच पध्दतीने करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय अग्निशमन दल १००.३ कोटींचे उत्पन्न अपेक्षित, स्थावर मालमत्ता विभाग १२.१५ कोटी, जाहीरात फी पोटी २४.६२ कोटी, अनुदान २८४.३२ कोटी अपेक्षित धरण्यात आले आहे.पालिकेवर ९२.६२ कोटींचे कर्जमहापालिकेची आर्थिक स्थिती आजही सावरतांना दिसून येत नाही. त्यात महापालिकेवर आजच्या घडीला ९३.६२ कोटींचे कर्ज शिल्लक असल्याचे दिसत आहे. यात केंद्र शासनाने अमृत २ अंतर्गत पाणी पुरवठा विस्तारासाठी ३२३ कोटी रकमेचा डिपीआर मंजुर केला असून या अंतर्गत केंद्र शासनाचा २५ टक्के, राज्य शासनाचा २५ आणि महापालिकेचा ५० टक्के हिस्सा असणार आहे. महापालिका हिस्याची रक्कम ही म्युनिसिपल बॉन्ड उभारुन किंवा कर्जाद्वारे उपलब्ध करुन घेण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.यावर योजनांवर दिला जाणार भरयंदा शहरभर शुन्य कचरा मोहीम राबविण्यात येणार असून घंटागाडी योजना अंतर्गत ८० कोटी व कचरा वेचक मानधन व सोयी सुविधा यासाठी ४ कोटी ५० लाख तरतूद प्रस्तावित, नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी २५ कोटी, विकेंद्रीत पध्दतीने यांत्रिकी कचरा प्रक्रिया केंद्रसाठी १ कोटी ५० लाख, सार्वजनिक रस्ते सफाई ८५ कोटी, स्वच्छता मोहीम ३० लाख, सफाई कामगारांची आरोग्य तपासणी, सफाई कामगारांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, स्वच्छ शौचालय, खड्डेमुक्त ठाणे, रस्त्यांचा कामांचा दर्जा उत्तम राहण्यासाठी विशेष प्रयत्न, शहर सौंदर्यीकरणावर भर दतांना प्रकल्प २.० राबविणे, यासाठी ५० कोटी, एकात्मिक तलाव संवर्धन व सुशोभिकरणासाठी २० कोटी, राज्य सरोवर संवर्धन योजना, ग्रीन संस्थेकडून तलाव संवर्धन आदींना प्राधान्य
महिला सक्षमीकरणावर भरयात महिला बचत गटांना शुन्य व्याज दराने कर्ज, धर्मवीर आनंद दिघे स्वंयरोजगार योजना, महिला बचत गटांच्या उत्पादनाची विक्री व प्रदर्शन, महिलांसाठी विशेष परिवहन सेवा, महिला सुरक्षितता, माझी आरोग्य सखी, महिला शौचालय, मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना आदींसह इतर योजनांवर भर दिला जाणार आहे.
याशिवाय प्रसुतीगृहांचे बळकटीकरण, जेष्ठ नागरीकांसाठी सुविधा, युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम, दिव्यांग कल्याणकारी योजना, मुकबधीर बालक मुक्त ठाणे अभियान, औषध चिठ्ठीमुक्त रुग्णालये, आपला दवाखान्यांची संख्या वाढविणे, गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पीटलचे विस्तारीकरण, इंदिराबाई बाबुराव सरनाईक हॉस्पीटल, कौसा हॉस्पाटील कार्यान्वित करण्याबरोबर याच ठिकाणी कर्करोग व उपचार व सुविधा निर्माण करणे, कळवा रुग्णालयाचे अद्ययावतीकरण, इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करण्याबरोबरच मराठी माध्यमांच्या शाळांचे सक्षमीकरणे, सुंदर शाळा, निसर्ग वाचनालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावआने ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय, हरित विकास कार्यक्रम, प्रदुषण मुक्त व धुळमुक्त ठाणे, पाणी पुरवठा योजनेचे सक्षमीकरण, मलनिसारण योजना, वाहतुक कोंडी सोडविण्यावर भर तसेच पार्कींग व्यवस्था वाढविण्यावर भर, नवीन ठाणे रेल्वे स्थानकासाठी प्रयत्न, क्लस्टर योजना, धर्मवीर आनंद दिघे स्मारक, आनंद आश्रम परिसर सुधारणा, चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची नवीन इमारत व वसतीगृह, कला, क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर, परिवहन सेवा मजबुतीकरण, उपर्दव शोधपथक, अॅडव्हास लोकॅलीटी मॅनेजमेंट आदींचा यात समावेश करण्यात आला आहे.