शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा-कळव्याच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी उपलब्ध; अजित पवार गटाने आमदार आव्हाडांना दिले आव्हान

By अजित मांडके | Updated: June 25, 2024 19:04 IST

...तर हा ५० कोटीचा निधी प्रभागनिहाय खर्च होणार आहे आणि कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील मागील १० वषार्तील कथीत विकास कामांचा दर आठवड्यातून एकदा पोलखोल केली जाणार असल्याचा इशारा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला. एकप्रकारे शरद पवार गटाचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांना डिवचण्याचाच प्रयत्न अजित पवार गटाकडून सुरु झाला आहे.

ठाणे :  मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून ५० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून कामांच्या निविदा निघाल्यावर येत्या पावसाळ्यातच नागरी विकास कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी दिली. तर हा ५० कोटीचा निधी प्रभागनिहाय खर्च होणार आहे आणि कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील मागील १० वषार्तील कथीत विकास कामांचा दर आठवड्यातून एकदा पोलखोल केली जाणार असल्याचा इशारा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला. एकप्रकारे शरद पवार गटाचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांना डिवचण्याचाच प्रयत्न अजित पवार गटाकडून सुरु झाला आहे.निधी मिळाल्याने मुंब्रा कळव्याच्या विकासाची खरी सुरुवात आता झाली आहे. येथील आमदारांकडून विकासाच्या नावाखाली मागील काही वर्षात पीए व ठेकेदार यांच्या मागणीप्रमाणे विकास निधीचा कसा व कुठे वापर झालेला आहे, याचा लेखाजोखा यापूर्वीच पुढे आला आहे. मुंब्रा कळवा क्षेत्रासाठी अल्पसंख्यांक विभागाकडूनही विशेष निधी महाराष्ट्र राज्य सरकारकडून दिला जाणार आहे. तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत कौसाच्या पुढील लोकवस्ती आठी, वाय जंक्शन च्या पुढेल लोकवस्तीसाठी वनखात्याच्या जागेवर केंद्र सरकारने मंजूर केलेले आणखीन एक कब्रस्थान बनविण्यात येईल, कामांच्या निविदा निघाल्यावर येत्या पावसाळ्यातच नागरी विकास कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या निधीचे वितरण प्रभाग निहाय केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  निवडून आलेल्या नगरसेवकांच्या मागणीनुसार, लोकांमध्ये जाऊन, लोकांना विचारुन, लोकशाही पद्धतीने विकास कामांसाठी प्रभागनिहाय हा ५० कोटीचा निधी खर्च होणार आहे. तसेच कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील मागील १० वषार्तील कथीत विकास कामांचा दर आठवड्यातून एकदा पोलखोल करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.अजित पवार गटाकडून नजीब मुल्ला यांचे नाव या मतदार संघातून विधानसभेसाठी पुढे आले आहे. त्यामुळे आव्हाड आणि मुल्ला यांच्यात येत्या काळात आणखी शाब्दीक चकमकी घडणार असल्याचेच चित्र आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसmumbraमुंब्राkalwaकळवा