शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 10:29 IST

Thane Mumbra Railway Accident: मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ काही प्रवासी ट्रेन मधून पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Mumbai Train Accident: मध्य रेल्वेच्या दिवा- मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.  फास्ट लोकल एकमेकांच्या शेजारून जात असतानाच हा भीषण अपघात झाला. मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान सीएसएमटी लोकल आणि कसारा लोकल एकमेकांना ओलांडत असताना ही घटना घडली. एक लोकल कसाऱ्याकडे तर दुसरी कसारा लोकल ही सीएसएमटीकडे जात असताना ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आणि जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

सीएएमटीकडून कसाऱ्याकडे जाणाऱ्या फास्ट लोकलमधून पडून या प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसरी लोकल सीएसएमटीकडे जात असताना कसारा फास्ट लोकल बाजूने जात होती. त्याचवेळी आठ प्रवासी हे लोकल ट्रेनमधून पडले. यामध्ये सात पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.

"पाच प्रवासी मुंब्रा स्थानकाच्या जवळ एका ट्रेनमधून पडल्याची माहिती मिळाली आहे. ही गाडी कसाऱ्याला जात होती. त्यातील गार्डने ही माहिती दिली. दिवा आणि मुंब्रा येथून रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे," अशी माहिती  रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल लीला यांनी दिली. 

"ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर सीएसएमटीकडे जाणारे काही प्रवासी ट्रेनमधून पडले. ट्रेनमध्ये जास्त गर्दी असल्याने हा अपघात झाल्याचे मानले जात आहे. रेल्वे प्रशासन आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. अपघाताची चौकशी सुरू झाली आहे. या घटनेमुळे स्थानिक सेवांवरही परिणाम झाला आहे," अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :Train Accidentरेल्वे अपघातmumbraमुंब्राcentral railwayमध्य रेल्वेthaneठाणेMumbai Localमुंबई लोकलlocalलोकलMumbai Train Updateमुंबई ट्रेन अपडेट