शहापूर दुर्घटनेमधील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत

By सुरेश लोखंडे | Published: August 1, 2023 10:00 AM2023-08-01T10:00:43+5:302023-08-01T10:01:31+5:30

समृद्धी महामार्गावर बांधकामाच्या वेळी झालेल्या  दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक 

5 lakh each to the families of the deceased workers in the shahapur tragedy | शहापूर दुर्घटनेमधील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत

शहापूर दुर्घटनेमधील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत

googlenewsNext

ठाणे : शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांच्या मृत्यूची नोंद. मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणाही त्यांनी केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश त्यांनी दिले आहेत. 

आज मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त पुणे येथे असून अपघाताचे वृत्त समजताच त्यांनी  जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून दुर्घटनेविषयी जाणून घेतले. हा अपघात अतिशय दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी करण्यासही त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी रवानाही केले. एन डी आर एफ चे पथक याठिकाणी पोहचले असून योग्य रीतीने बचाव कार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्यासही त्यांनी सांगितले आहे. समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला.

Web Title: 5 lakh each to the families of the deceased workers in the shahapur tragedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.