ठाणे जिल्ह्याचा ४५० कोटींचा आराखडा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 01:14 AM2021-02-12T01:14:25+5:302021-02-12T01:14:42+5:30

जिल्हा वार्षिंक योजनेसाठी (सर्वसधारण) अंतर्गत २०२१-२२ च्या आराखड्यासाठी ३३२.९५ कोटी  रुपयांची मर्यादा शासनाने दिली होती.

450 crore plan of Thane district approved | ठाणे जिल्ह्याचा ४५० कोटींचा आराखडा मंजूर

ठाणे जिल्ह्याचा ४५० कोटींचा आराखडा मंजूर

Next

ठाणे  : उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ठाणे  जिल्ह्यास जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत (सर्वसाधारण) २०२१-२२ या वर्षासाठी ४५० कोटी  रुपयांच्या आराखड्यास गुरुवारी मान्यता देण्यात आली.

जिल्हा वार्षिंक योजनेसाठी (सर्वसधारण) अंतर्गत २०२१-२२ च्या आराखड्यासाठी ३३२.९५ कोटी  रुपयांची मर्यादा शासनाने दिली होती. जिल्ह्याची गरज लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीने राज्यस्तरीय बैठकीत  नियतव्ययाच्या मर्यादेत आराखडा केला होता. विविध विभागांची अधिकची मागणी लक्षात घेऊन  ११७ कोटी  रुपयांचा वाढीव म्हणजेच ४५० कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिली.

 बैठकीस नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड,  जि.प. अध्यक्षा सुषमा लोणे, सर्व आमदार, विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ,  जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे, जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे आदी उपस्थित होते.

कोकण विभागातील  सर्व  जिल्ह्यांपैकी नमूद निकषांची पूर्तता करणाऱ्या एका जिल्ह्यास प्रोत्साहनपर आनुदान देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. यामध्ये  आय-पास प्रणालीचा प्रभावी वापर करणे, नियोजन समितीच्या नियमित बैठका घेणे, अखर्चित निधी कमी करणे, वेळेत प्रशासकीय मान्यता देणे, शाश्वत विकासाचे ध्येय प्रगती, अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती घटकांसाठी योजनांची अंमलबजावणी करणे, नाविन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी आदी निकषांचा समावेश आहे. यावेळी  जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या कामासाठी आवश्यक वाढीव निधीची माहिती दिली. 

सवाद येथे होणार जिल्हा रुग्णालय 
भिवंडी तालुक्यातील सवाद येथे सध्या असलेले कोविड रुग्णालय हे कायमस्वरूपी  जिल्हा रुग्णालय करण्यासाठी निधीची मागणी पालकमंत्री, लोकप्रतिनिधी व  जिल्हा प्रशासनाने केली आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाशी विचार-विनिमय करून येत्या अर्थसंकल्पात पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले. 

Web Title: 450 crore plan of Thane district approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.