शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

बस चालकाच्या प्रसंगवधानामुळे वाचले ४५ प्रवाशांचे प्राण, टिएमटीच्या बसचे झाले ब्रेक फेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 6:11 PM

पारसिक नगर येथे टिएमटीचा ब्रेक फेल झाल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने चालकाने दाखविलेल्या प्रंसगावधनाने बसमधील सुमारे ४५ प्रवाशांचा जीव वाचला आहे.

ठळक मुद्देआठवड्यातील दुसरी घटनाबसमधील ४५ प्रवाशांचा वाचला जीवकाही प्रवाशांनी बचावासाठी बसमधून मारल्या उड्या

ठाणे - ठाणे ते अलीमघरच्या दिशेने निघालेल्या टिएमटी बसचा पारसिक नगर येथे ब्रेक फेल झाल्याची घटना घडली. परंतु चालकाने दाखविलेल्या प्रंसगावधानामुळे बसमधील सुमारे ४५ प्रवाशांचा जीव वाचला आहे. चालकाने लागलीच गाडी रस्त्याचे काम सुरु असलेल्या ठिकाणी खाली उतरविली. परंतु या गडबडीत काही प्रवाशांनी चालत्या बसमधून उड्या देखील मारल्या. सुदैवाने ते देखील सुखरुप बचावले आहेत.बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास ठाणे स्टेशन ते अलीमघर अशी टिएमटीची बस निघाली. जवळ जवळ अर्धा ते पाऊण तासाच्या अंतराने या बसच्या फेऱ्या  असल्याने या बसला नेहमीच कोणत्याही वेळेस गर्दी असते. त्यामुळे दुपारची वेळ असतांना देखील या बसमध्ये सुमारे ४० ते ४५ प्रवासी बसले होते. ही बस पारसिक नगर येथे पोहचली असता. येथील स्थानकावर प्रवाशांना उतरायचे होते. त्यामुळे बसच्या चालक चोरगे याने बसचा ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु ब्रेक काही लागला नाही. त्यामुळे गाडीचे ब्रेक फेल झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यातही प्रवाशांना उतरायचे असल्याने त्यांनी बस थांबविण्याची विनंती देखील केली. परंतु बस काही थांबत नव्हती. त्यामुळे काही प्रवाशांनी बसमधून उड्या मारुन आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे यावेळेस बसचा वेग कमी असल्याने उडी मारलेल्या प्रवाशांचा जीव वाचला. दरम्यान उर्वरित प्रवाशांना वाचविण्यासाठी चालकाने गाडी तत्काळ रस्त्याच्या खाली उतरविली. याठिकाणी रस्त्याचे कॉंक्रीटीकरणाचे काम सुरु असल्याने बस रस्त्याच्या खाली उतरताच थांबली आणि सुदैवाने बसमधील सर्वच प्रवाशांचा जीव वाचला.दरम्यान आठ दिवसापूर्वी पूर्णा येथे निघालेल्या बसचा टायर फुटून दोन पादचाऱ्याना मार लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर आठवड्यातच अशा प्रकारे दुसरी घटना घडल्याने टिएमटीच्या जुन्या बस बाबत शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त