शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचायती बिनविराेध; आठ ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी नाही!

By सुरेश लोखंडे | Updated: October 26, 2023 18:46 IST

जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायती ग्रामीण व दुर्गम भागात सक्रीय आहे.

सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: जिल्ह्यातील १३१ ग्राम पंचायतींच्या निवडणुका व  पाेटनिवडणुकांसाठी ५ नाेव्हेंबरराेजी मतदान आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज मागवून छाननी करण्यात आली. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेतले असता तब्बल ४३ ग्राम पंचायती बिनविराेध निवडून आल्या. यामध्ये १२ ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक तर ३१ ग्राम पंचायतींच्या पाेटनिवडणुका ह्या बिनविराेध झाल्याचे उघड झाले. यावेळी मात्र एक ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी व सातच्या पाेटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाही.

जिल्ह्यातील ४३१ ग्राम पंचायती ग्रामीण व दुर्गम भागात सक्रीय आहे. त्यापैकी ६१ ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका हाती घेतल्या आहेत. त्यासाठी उमेदवारी मागवण्यात आली असता २६५ जणांनी सरपंच पदासाठी तर एक हजार ३१६ जणांनी सदस्य पदासाठी अर्ज दाखल केले. मात्र छाननीमध्ये एकूण ३७ सदस्यांचे व सरपंच पदाच्या तीन जणांचे नामनिदेर्शनपत्र बाद झाले आहे.

शिल्लक राहिलेल्यापैकी ११० जणांनी सरपंच पदाचे उमेदवारी मागे घेतली तर ३८९ जणांनी सदस्य पदाची उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे या पंचवार्षिक निवडणुकीच्या १२ ग्राम पंचायती बिनविराेध निवडणून आलेल्या आहेत. यामध्ये दहा मुरबाड तालुक्यातील तर दाेन भिवंडीमधील आहेत. उर्वरित फक्त ४८ ग्राम पंचायतींसाठी १३५ सरपंच पदासाठी तर ७१५ सदस्य पदासाठी निवडणूक रिंगणात आहेत. उर्वरीत फक्त एका ग्राम पंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.

या वेळी ७० ग्राम पंचायतींच्या पाेटनिवडणुकासाठी उमेदवारी दाखल झाली असता माघारीनंतर ३१ ग्राम पंचायती बिनविराेध आलेल्या आहेत. तर सात ग्राम पंचायतींसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. ठाणे तालुक्यातील दाेन ग्राम पंचायतींच्या दाेन सदस्य रिंगणात आहेत. भिवंडीच्या चार सरपंच पदासाठी एकही अर्ज आलेला नाही. तर तीन जागांवरील सदस्य बीनविराेध विजयी झाले असून ११ छाननीत बाद झालेे तर एकाने उमेदवारी मागे घेतली आहे. याप्रमाणेच शहापूरच्या ४० ग्रामच्या पाेटनिवडणुकीपैकी २२ ग्राम पंचायती बिनविराेध झाल्या असून सात जागांसाठी एकही अर्ज नाही. मुरबाडच्या १३ ग्राम पंचायतींच्या पाेटनिवडणुकांमध्ये पाच बिनविराेध आल्या. तर दाेन सदस्य रिंगणात आहे. अंबरनाथला एक ग्राम पंचायत बिनविराेध असून चार सदस्य रिंगणात आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक