मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये दिवसभरात कोरोनाचे ४ नविन रुग्ण आढळुन आले आहेत. त्यामुळे शहरातील एकुण कोरोना लागण झालेल्यांची संख्या ३६ झाली आहे. दिवसभरात नव्याने सापडलेले हे रुग्ण भाईंदरच्या गोडदेव भागात २ तर मीरारोडच्या नया नगर भागातले २ जण आहेत. तर ७० जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल अजुन प्रलंबित आहेत.गोडदेव भागात १९ वर्षीय युवक व ४९ वर्षाच्या महिलेस कोरोनाची लागण झाली आहे. या आधी देखील येथे रुग्ण सापडले आहेत. तर नया नगरच्या लोढा मार्गावरील १५ वर्षाच्या मुलीस आणि पुजा नगर मधील ४८ वर्षाच्या महिलेस कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने बाधित झालेले आहेत. काल शनिवारी सुध्दा भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्लीत ३७ वर्षीय पुरुष तर पूजा नगर मध्ये २० वर्षीय तरुणा कोरोना ग्रस्त आढळला होता.
मीरा भाईंदर मध्ये कोरोनाचे आणखी ४ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 19:58 IST