शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Thane: मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात  ४ लाख ३९ हजार २८३ मतदार  

By धीरज परब | Updated: March 19, 2024 23:10 IST

Thane News: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघात १७ हजार १० इतके मतदार वाढून एकूण मतदारांची संख्या ४ लाख ३९ हजार २८३ हजार इतकी झाली आहे. 

मीरारोड - लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघात १७ हजार १० इतके मतदार वाढून एकूण मतदारांची संख्या ४ लाख ३९ हजार २८३ हजार इतकी झाली आहे . 

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नंतर ठाणे लोकसभा मतदार संघात येणाऱ्या मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघातील मतदारांची आकडेवारी व निवडणुकीच्या अनुषंगाने उपाययोजना आदींची माहिती निवडणूक नायब तहसीलदार प्रदीप मुकणे यांनी दिली . तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुनील भुताळे यांनी अपर तहसीलदार कार्यालयात येऊन निवडणूक कामाचा आढावा घेतला व सूचना केल्या . 

मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादी नुसार ४ लाख ३९ हजार २८३ मतदार आहेत. त्यात २ लाख ५ हजार ६२५ महिला मतदार तर २ लाख ३३ हजार २८३  पुरुष मतदारांची संख्या आहे . ४ तृतीयपंथी मतदार आहेत. १७ हजार १० मतदार वाढले आहेत . तर विशेष मोहीम राबवून मृत, दुबार व स्थलांतरित मतदारांचा आढावा घेऊन आतापर्यंत ७ हजार १०९ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. 

निवडणुकीसाठी शाळा, सभागृह व मंडप आदी मध्ये ७४ ठिकाणी मतदान केंद्र निश्चित केली असून त्यात ४५१ मतदान बूथ असतील . सर्व मतदान बूथ हे तळमजल्यावरच असतील . मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघासाठी ५६३ मतदान यंत्रांची मागणी केली आहे. मीरारोडच्या रॉयल कॉलेज मध्ये मतदान यंत्रांचे वाटप, स्वीकृती साठी स्ट्रॉंग रुम तयार केले आहे.

आचारसंहिता चे काटेकोर पालन व्हावे यासाठी ३ स्थायी व ३ भरारी पथके २४ तास कार्यरत राहणार आहेत. निवडणुकीसाठी प्रचार सभा , प्रचार फेरी , मंडप आदींसाठी परवानगी बंधनकारक असून त्यासाठी स्वतंत्र पथक नेमले आहे. वर्ग १ ते वर्ग ४ चे सुमारे ३ हजार ५०० अधिकारी व कर्मचारी निवडणुक कामी तैनात आहेत . दिव्यांग तसेच ८५ वर्षांवरील वृद्ध मतदारांना घरातूनच मतदान करायचे असल्यास १२ डी हा अर्ज अपर तहसीलदार कार्यालय येथील निवडणूक कार्यालयातुन कर्मचारी घरी येऊन अर्ज भरून नेणार आहेत . 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे