शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ३७३ रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 03:14 IST

ठाणे परिसरात १०० रुग्ण आढळले आहेत. या शहरात आता ५७ हजार २५९ बाधित झाले आहेत. अवघे दोन मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार ३४० झाली.

ठाणे : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ३७३ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ४९ हजार १८२ रुग्णसंख्या झाली आहे. ठाण्यात दोन आणि नवी मुंबईत एक असे एकूण जिल्ह्यात फक्त तीन मृत्यू झाले आहेत. अन्य शहरांत कोठेही मृत्यू झालेला नाही. आता जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार ५२ झाली आहे.ठाणे परिसरात १०० रुग्ण आढळले आहेत. या शहरात आता ५७ हजार २५९ बाधित झाले आहेत. अवघे दोन मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार ३४० झाली. कल्याण-डोंबिवलीत १०६ रुग्णांची वाढ झाली. या शहरात ५९ हजार ६६ बाधित झाले असून, एक हजार ११८ मृत्यू कायम आहेत.उल्हासनगरला ११ बाधित सापडले असून, एकही मृत्यू नाही. भिवंडीला चार रुग्ण आढळल्याने आता बाधित सहा हजार ६६१ झाले असून, मृतांची संख्या ३५२ झाली आहे. मीरा-भाईंदरमध्ये २८ रुग्णांची नोंद झाली आहे. अंबरनाथमध्ये १३ रुग्णांची नव्याने वाढ झाली असून, बाधितांची संख्या आठ हजार ४५९ झाली असून, ३०९ मृत्यू कायम आहेत. बदलापूरला २१ रुग्णांची नोंद झाल्यामुळे येथे नऊ हजार १३६ बाधित झाले, मृत्यूंची संख्या १२० झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सहा रुग्णांची नोंद झाली असून, एकही मृत्यू नाही. आता बाधित १८ हजार ९७८ झाले असून, मृत्यू ५८३ नोंदले आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे