शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शाळा आणि विध्यार्थ्यांच्या मदतीला ३६०ट्रॅक चा ऑनलाईन प्लॅटफॉर्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 17:18 IST

ऑनलाइन शिक्षणासाठी फी न आकारणाऱ्या शाळांसाठी मोफत प्लॅटफॉर्म देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशाळा आणि विध्यार्थ्यांच्या मदतीला ३६०ट्रॅक चा ऑनलाईन प्लॅटफॉर्मऑनलाइन शिक्षणासाठी फी न आकारणाऱ्या शाळांसाठी मोफत प्लॅटफॉर्मस्वयं मूल्यांकनासाठी ऑनलाइन टेस्ट

ठाणे : कोरोनाच्या महामारीने सर्वांच्याच व्यवहार व वर्तनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. व्यक्तिगत संपर्क असो की, सार्वजनिक वावर; त्यावर निर्बंध आले आहेतच, शिवाय हे संकट कधीपर्यंत राहील याचा निश्चित अंदाजही बांधता येणारा नसल्याने शालेय शिक्षणावर देखील याचा परिणाम होताना दिसत आहे. कोरोनामुळे जगभरातील शाळांना आणि शिक्षकांना नवनव्या कल्पना वापरून पारंपरिक शिक्षणपद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करण्याची संधी प्राप्त झाली आहे. अशा  परिस्थितीत ऑनलाईन शिक्षण हे अतिशय प्रभावी माध्यम ठरू शकते. आपल्या देशात स्मार्टफोन चे ५० कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. या सर्व बाबी लक्षात घेत ठाणे येथील 360ट्रॅक या संस्थेने ई-लर्न नावाचा सर्वसमावेशक ऑनलाईन प्लॅटफॉर्म विकसित केला आहे.

कोरोनाच्या या संकटात विध्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अतिशय सृजनशीलतेने आणि अर्थपूर्ण पद्धतीने या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये शाळा - मग त्या मराठी माध्यमाच्या असोत की इंग्रजी माध्यमाच्या, स्टेट बोर्डाच्या असोत कि केंद्रीय बोर्डाच्या, अगदी महाविद्यालयापासून ते एखाद्या छोट्या कोचिंग क्लास पर्यंत सगळ्याच शैक्षणिक संस्थांना या प्लॅटफॉर्म चा वापर करता  येणार आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर काहीही परिणाम न होता, त्यांना सहज व सोप्या पद्धतीने अभ्यास करता यावा, म्हणून आमच्या 360ट्रॅक या संस्थेने ई-लर्न ची निर्मीती केली असल्याचे संस्थेचे संस्थापक मयूर दाभाडे यांनी सांगितले. हा प्लॅटफॉर्म ज्या शाळा ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांकडून फीस आकारणार नाहीत, त्यांच्यासाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्याचा 360ट्रॅक चा मानस आहे.

ई-लर्न  प्लॅटफॉर्मवर विषय आणि पाठानुसार विडिओ, इमेज आणि पी डी एफ फाईल अपलोड करायची सोय आहे. तसेच, प्रत्येक पाठानंतर विध्यार्थ्यांना स्वयं-मूल्यांकनासाठी ऑनलाईन टेस्ट ची देखील सुविधा देण्यात आलेली आहे. याव्यतिरिक यामध्ये लाईव्ह कलासरूम ची संकल्पना देखील विकसित करण्यात आलेली आहे, जेणेकरून शिक्षक विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधू शकतात. सदर प्लॅटफॉर्म elearn.360track.in या लिंक वर उपलब्ध आहे.  

360ट्रॅक ने मागील ४ वर्षांत त्यांच्या प्रॉडक्ट च्या माध्यमातून बऱ्याच शाळांना डिजीटाईज करण्याचे काम केलेले आहे. तसेच, देशभरातील ३० शहरांमध्ये 360ट्रॅक चे जाळे आहे. ऑनलाईन शिक्षण हा शालेय शिक्षणाला पर्याय होऊ शकत नाही, पण शिक्षणासाठी चे पूरक माध्यम म्हणून नक्कीच ई लर्निंग कडे बघता येईल, असे मत संस्थेचे अध्यक्ष संजय दाभाडे यांनी व्यक्त केले. ऑनलाइन शिक्षणातून मिळणारी स्वायत्तता आणि स्व-अध्ययन हीदेखील मोठी जमेची बाजू आहे, हे विसरता कामा नये. खरे तर प्रत्येक मुलाला वेगळ्या प्रकारच्या शाळेची आवश्यकता असते, कारण प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययनाची पद्धत वेगळी असते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीचे शालेय शिक्षण आणि ई-लर्निंग यांची सांगड घालणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळाonlineऑनलाइन