शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

राजन विचारेंचा ३५ वर्षांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 23:03 IST

कामगार ते खासदार : सेनेचा ठाण्यातील गड राखण्यात यशस्वी

- अजित मांडके 

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा शिवसेनेचे राजन विचारे यांनी विजय संपादित केला आहे. त्यामुळे शिवसेनेला आपला ठाण्याचा पारंपरिक गड राखण्यात यश आले आहे.

विचारे यांचा आजवरचा राजकारणाचा ३५ वर्षांचा प्रवास झाला आहे. खासगी नोकरीत काम करणारे कामगार ते बांधकाम व्यावसायिक असा प्रवास करत असताना एक निष्ठावान शिवसैनिकापासूनत्यांनी शाखाप्रमुख ते खासदार असा पल्ला गाठला आहे.त्यांचे शिक्षण अकरावीपर्यंत झाले आहे. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. त्यामुळे ते शिक्षण झाल्यावर खासगी कंपनीत कामाला लागले. याच काळात त्यांची शिवसेनेशी नाळ जोडली गेली. त्यांना तसा वडिलांचा वारसासुद्धा लाभला असल्याने ते शिवसैनिक म्हणून सक्रिय झाले. मधल्या काळात नोकरी सोडून त्यांनी बांधकाम व्यवसायात आपले नशीब आजमावण्यास सुरुवात केली. तसेच शिवसैनिक म्हणूनही ते स्वर्गीय आनंद दिघे यांच्यासोबत काम करू लागले. त्यानंतर, शाखाप्रमुखपासून त्यांचा हा राजकीय प्रवास खºया अर्थानेसुरूझाला. वयाच्या तेविसाव्या वर्षी ते प्रथमच नगरसेवक झाले. त्यानंतर, सलग चार वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांच्या या कारकिर्दीत सभागृह नेतेपद, स्थायी समिती सभापतीपद आणि महापौरपदही त्यांनी भूषवले होते.

ठाणे शहराचा विकास आराखडा मंजूर होत असताना त्या कमिटीवरही ते प्रमुख म्हणून विराजमान होते. त्यानंतर, २००० साली त्यांना आमदारकीची संधी पक्षाने दिली. या आमदारकीच्या निवडणुकीतही त्यांनी बाजी मारली आणि पक्षाचा विश्वास सार्थकी ठरवला. त्यानंतर, पुन्हा त्यांच्यावर पक्षाने विश्वास टाकला आणि २०१४ मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाची खासदारकीची उमेदवारी दिली.निर्विवाद वर्चस्वपहिल्याच निवडणुकीत विचारे यांना दोन लाख ८२ हजारांचे निर्विवाद वर्चस्व संपादित करून खासदार होण्याचा मान मिळवला. त्यानंतर, २०१९ मध्ये पुन्हा त्यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार होण्याचा मान मिळवला आहे.