शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात ३३३ रुग्ण शनिवारी आढळले; सात जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 20:33 IST

उल्हासनगरला २० रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. आता या शहरात ११ हजार ३७४ बाधीत असून मृत्यू संख्या ३६१ आहे. भिवंडीला चार रुग्ण सापडला असून एकही मृत्यू नाही.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ३३३ रुग्ण शनिवारी आढळून आले असून सात जण दगावले आहेत. आता जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या दोन लाख ४३ हजार ८७१ झाली असून पाच हजार ९७४ मृतांची संख्या आहे. ठाणे शहरात १०३ रुग्ण सापडले आहेत. या शहरात आतापर्यंत ५५ हजार ६४८ रुग्ण नोंदले असून आज एकही मृत्यू नाही. त्यामुळे मृतांची संख्या एक हजार ३१० कायम आहे. कल्याण - डोंबिवलीत ८५ रुग्ण आढळून आले असून दोघांचा मृत्यू आहे. या शहरात आता ५७ हजार ६५० बाधीत असून एक हजार १०६ मृत्यू झाले आहेत.        उल्हासनगरला २० रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. आता या शहरात ११ हजार ३७४ बाधीत असून मृत्यू संख्या ३६१ आहे. भिवंडीला चार रुग्ण सापडला असून एकही मृत्यू नाही. येथे सहा हजार ६११ बाधितांची तर, ३५२ मृतांची नोंद आहे. मीरा भाईंदरला २४ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता २५ हजार ४६९ बाधितांसह ७८३ मृतांची संख्या आहे. अंबरनाथ शहरात सात रुग्ण सापडले आहे. तर, दोन मृत्यू आहे. या शहरात आता आठ हजार २६२ बाधितांसह मृतांची संख्या ३०५ नोंदवण्यात आली. बदलापूरला १३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण आठ हजार ९०२ असून एकही मृत्यू नसल्याने मृत्यूची संख्या ११९ आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात ११ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. या गांवपाड्यांत १८ हजार ७८७ बाधीत झाले असून ५८१ जणांचा मृत्यू झालेला आहे. 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या