शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत भरारी पथकाकडून ३३१६०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त

By सुरेश लोखंडे | Updated: October 27, 2024 20:47 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार भिवंडी पश्चिमचे भरारी पथक व नारपोली पोलीसांच्या संयुक्त कारवाईत संशयित वाहनांमध्ये तीन लाख ३१ हजार ६०९ रुपयांचा  मुद्देमाल विनातपशील आढळला.  त्यांमध्ये  चांदी व चांदी चे काम असलेल्या वस्तूंचा समावेश आहे.  या वस्तूंच्या तपासणी दरम्यान संबंधित बील पावत्या नसल्याने या भरारी पथकाने धड़क कारवाई करीत हा मुद्देमाल जप्त केला आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 रविवारी पहाटे ३ वाजता केलेल्या या संयुक्त कारवाईत एक संशयित वाहन ताब्यात घेण्यात आले. या वाहनामध्ये असलेल्या सामानाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता वाहनचालक व गाडीतील इतर कर्मचाऱ्याना सामानाबाबत कोणतीही माहिती देता न आल्याने पोलिसांनी ही गाडी नारपोली पोलीस ठाण्यात आणली. पोलीस व भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी गाडीतील साहित्य कुरिअर एजन्सीचे मालक व पंचासमक्ष गाड़ी तुन खाली उतरावला. संशयित वाहनातून एकंदर  ७३ छोटे मोठे बॉक्स मधील साहित्य व त्या साहित्याच्या बिलाची तपासणी केली.

या वाहनामध्ये असलेल्या ७२ बॉक्स मधे सोने, चांदी व गिफ्ट आर्टिकल असलेले एकंदरीत दोन दोन कोटी आठ लाख सतरा हज़ार आठशे वीस रुपये  चा मुद्देमाल सापडला. तपासणी दरम्यान संबंधित कुरिअर चालकाने बॉक्सनिहाय त्यात समाविष्ट असणाऱ्या साहित्य व तपशील असणारे पक्के बिल सादर केले व अनुषंगिक खात्री पंचासमक्ष व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले. त्यानुसार एकूण ६० बॉक्स मध्ये असलेल्या सोने व चांदी चे गिफ्ट आर्टिकल दोन कोटी  चार लक्ष ८६ हजार २१७ रुपयांचे चे बिल सादर केले. मात्र उर्वरित बॉक्समध्ये असलेल्या तीन लक्ष ३१ हजार ६०९ रुपयांच्या मुद्देमालातीऋल चांदी व चांदी चे काम असलेले गिफ्ट आर्टिकलचे  बिल संबंधितास सादर करता आले नाही. त्यामुळे या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.