शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

ठाणे जिल्ह्यात सापडले नवे ३३ रुग्ण, ठाणे शहराची संख्या २०० पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 02:27 IST

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक ११ रुग्ण सापडल्याने येथील एकूण रुग्णांच्या संख्येने द्विशतक पूर्ण केले आहे.

ठाणे : जिल्ह्यात शनिवारीही नवीन कोरोना पॉझिटिव्ह ३३ रुग्ण आढळले. यामध्ये ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक ११ रुग्ण सापडल्याने येथील एकूण रुग्णांच्या संख्येने द्विशतक पूर्ण केले आहे. तर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ६१५ इतकी झाली आहे. ठामपा क्षेत्रामध्ये शनिवारी दोघांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या १९वर पोहोचली आहे. या मृतांमध्ये एक ८० वर्षीय पुरुष आणि ४८ वर्षीय महिलेचा समावेश असून ते विविध आजारांनी ग्रस्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शुक्रवारी जिल्ह्यात ३७ रुग्ण आढळले होते. तर शनिवारी सापडलेल्या ठाण्यातील ११ रु ग्णांमध्ये ७ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे. या रुग्णांमुळे येथील एकूण रुग्णांची संख्या २०७ झाली आहे. केडीएमसीमध्ये मिळालेल्या तीन रुग्णांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. पुरुष रुग्णांमध्ये एक मुंबईतील पोलीस आहे. येथील एकूण रुग्णसंख्या ११७ झाली आहे. नवी मुंबई आणि मीरा-भार्इंदर येथे शनिवारी प्रत्येकी ९ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील एकूण रुग्ण ११२, मीरा-भार्इंदरमधील एकूण संख्या १२९ झाली आहे. त्याचबरोबर ठाणे ग्रामीणमध्ये एक नवीन रुग्ण आढळल्याने येथील संख्या १७ झाली. भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथे एकही रुग्ण शनिवारी आढळून आलेला नाही.>अंबरनाथ ‘कोरोना रुग्ण’मुक्त शहरअंबरनाथ : शहरात कोरोनाचे ४ रुग्ण आढळले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला. तर इतर ३ रुग्णांवर उपचार सुरू होते. या तिघांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. तिघांना रुग्णालयातून सोडण्यात आले असून त्यांना होम क्वारंटाइन केले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी देविदास पवार आणि कोरोनासाठी नेमलेले डॉ. मेजर नितीन राठोड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. शहराच्या सुरक्षेसाठी आणखी उपाययोजना आखत असल्याचे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस