शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पालघरचे ३२१ शिक्षक अखेर ठाणे जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 06:27 IST

चार वर्षांपासून पालघर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ३२१ शिक्षकांना पुन्हा ठाणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाली आहे. तर ठाणे जिल्ह्यातून ११२ शिक्षकांची पालघरमध्ये बदली झाली आहे.

ठाणे - चार वर्षांपासून पालघर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ३२१ शिक्षकांना पुन्हा ठाणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाली आहे. तर ठाणे जिल्ह्यातून ११२ शिक्षकांची पालघरमध्ये बदली झाली आहे.ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर १ आॅगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी मे मध्ये झालेल्या शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये ५५० हून अधिक शिक्षक पालघरमध्ये फेकले गेले. पालघरची स्थापना झाल्यानंतर शिक्षकांना बदलीसाठी जिल्हा बदलीचा नियम लागला. त्यामुळे या शिक्षकांचा पुन्हा ठाणे जिल्ह्यात परतण्याचा मार्ग बंद झाला. बहुसंख्य शिक्षकांची कुटुंबे व मुले शिक्षणासाठी ठाण्यात व नोकरी पालघरमध्ये अशी स्थिती निर्माण झाली. काही शिक्षकांना घरापासून शाळेपर्यंत पोचण्यासाठी सहा ते सात तासांचा अवधी लागत होता.त्यामुळे या शिक्षकांच्या पुन्हा ठाणे जिल्ह्यात बदलीसाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार हे तीन वर्षांपासून पाठपुरावा करीत होते. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शिक्षण समितीचे सभापती म्हणून त्यांनी नव्याने प्रयत्न सुरू केले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मंत्रालयात बैठका घेण्यात आल्या. तसेच ठाणे व पालघर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. राज्य सरकारने पालघरमधून ठाण्यात ३२१ शिक्षकांच्या बदल्या केल्याची माहिती जि.प.चे उपाध्यक्ष पवार यांनी दिली. ठाणे जिल्ह्यातून ११२ शिक्षकांची पालघर जिल्ह्यात बदली झाली. मात्र, ठाण्यात जागा रिक्त झाल्यानंतर साधारण दीड वर्षांत शिक्षकांना पुन्हा ठाणे जिल्ह्यात घेतले जाईल, अशी माहिती पवार यांनी दिली.पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव, उपाध्यक्ष सुभाष पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांचे आभार मानण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षक सोमवारी ठाण्यात आले होते. एका अनौपचारिक कार्यक्रमात शिक्षकांनी पदाधिकाºयांचे आभार मानले. विकल्प समितीचे शंकर भोईर यांनी पदाधिकाºयांचा सत्कार केला. तसेच जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, शिक्षणाधिकारी मीना यादव यांचेही शिक्षकांनी आभार मानले.ठाण्यात जागा रिक्त झाल्यानंतर बदलीच्अखेर सुभाष पवार यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, राज्य सरकारने पालघरमधून ठाण्यात ३२१ शिक्षकांच्या बदल्या केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी दिली.च्ठाणे जिल्ह्यातून ११२ शिक्षकांची पालघर जिल्ह्यात बदली झाली. मात्र, ठाणे जिल्ह्यात जागा रिक्त झाल्यानंतर साधारण दीड वर्षांत शिक्षकांना पुन्हा ठाणे जिल्ह्यात घेतले जाईल, अशी माहिती पवार यांनी दिली.

टॅग्स :Teacherशिक्षकthaneठाणेEducation Sectorशिक्षण क्षेत्र