शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

व्हॅलेंटाइन डेचा मुहूर्त साधत ठाण्यातील ३०० विद्यार्थ्यांची किल्ले सफारी; मनसेचा अनोखा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 10:46 IST

शिवरायांना वंदन करुन शिवनेरीवर फडकवला भगवा

ठाणे : 'प्रेम करावे तर कोणावर करावे; शिवाजी महाराजांच्या विचारांवर; गडकिल्ल्यांवर करावे' असा संदेश देत आज १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाइन डेचा मुहूर्त साधत ठाण्यातील ३०० विद्यार्थ्यांना 'शिवनेरी' किल्ल्याची सफर घडविण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ओवळा माजिवडा विधानसभेच्यावतीने हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. सध्या पबजी आणि सोशल मीडियाच्या युगात विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि त्यांचा इतिहास विद्यार्थ्यांना समजावा यासाठी हा उपक्रम हाती घेत शिवरायांना वंदन करून शिवजयंतीच्या एक आठवडा आधीच शिवनेरीवर भगवा ध्वज फडकावण्यात आला. 

कोरोना काळात लाॅकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने शैक्षणिक सहलींना ब्रेक लागला होता. त्यातच आज रविवार सुट्टीचा दिवस आणि जगभर व्हॅलेंटाईन डेची धूम सुरू असतानाच आठवडाभरावर आलेल्या शिवजयंतीच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ओवळा माजिवडा विधानसभेच्यावतीने परिसरातील तीनशेहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनींना पुण्याच्या जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्याची सफर घडवली. ठाण्याच्या लोकमान्यनगर परिसरातून पहाटे विविध बसेसमधून विद्यार्थी शिवनेरी किल्ल्याच्या दिशेने रवाना झाले. ठाणे ते पुणे असा बस प्रवास, विद्यार्थ्यांना नाश्ता, जेवण आदी सोयी उपक्रमात मोफत पुरविण्यात आल्या.महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उप शहर अध्यक्ष संदीप चव्हाण व सचिव मयूर तळेकर यांनी गेल्या महिनाभरापासून या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांची नावनोंदणी सुरू केली होती. त्यानुसार विभाग अध्यक्ष विवेक भंडारे, उपविभाग अध्यक्ष सागर वर्तक, मंदार पाष्टे, सोमनाथ भोईटे, शाखाध्यक्ष निखिल येवले, आकाश मोरे, संदीप शेळके, दिपक पोळ, प्रशांत पालव, ऋषिकेश घुले, अमोल मडये, विघ्नेश शेलार यांच्या टीमने आज विद्यार्थ्यांची वर्गवारी करून त्यांना शिवनेरीवर नेणे,  या किल्ल्याची विद्यार्थीवर्गास माहिती देणे अशी व्यवस्था पाहिली.

उपक्रमाचे यंदाचे चौथे वर्षगेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे यंदा अधिक मोठ्या प्रमाणात किल्ले सफर मोहीम हाती घेण्यात आली. पुढील वर्षी एका नव्या किल्ल्यावर विद्यार्थ्यांना नेण्यात येईल. त्यावेळी ही संख्या हजारोंच्या घरात असेल अशी माहिती यावेळी उप शहर अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेMNSमनसे