शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नायजेरियात २२ भारतीय खलाशांना बेड्या; मालवाहू जहाजावर कोकेन सापडले...
2
धक्कादायक! अमेरिकेत भारतीय तरुणीचा खून करून प्रियकर भारतात पसार; पोलिसांना भेटून आला...
3
वंदे भारत एक्सप्रेस रुळावरून घसरण्याचा कट! रुळांवर लाकूड ठेवल्याचे आढळले; मोठा अपघात टळला
4
बँक कर्मचारी संपावर जाणार, तीन दिवस व्यवहार होणार ठप्प; कधी, कुठे अन् कसा परिणाम होईल?
5
धक्कादायक! ट्रंप यांची व्हेनेझुएलावर दुसऱ्या हल्ल्याची धमकी; आता कोलंबियाही रडारवर, दक्षिण अमेरिकेत युद्धाचे ढग?
6
भाजपविरोधात १०१, तर शिंदेसेनेच्या विरोधात ८३ ठिकाणी मनसे लढणार; मराठी मते कोणाला मिळणार?
7
आजचे राशीभविष्य ५ जानेवारी २०२६ :आज ग्रहांची चाल 'या' राशींसाठी ठरणार फलदायी; पाहा तुमचे राशीभविष्य!
8
‘बिनविरोध’ निवडीवरून राज्यात राजकीय रणकंदन; मुख्यमंत्री फडणवीस यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर
9
मुंबईत १० रुपयांत जेवण, ठाकरेंचा शब्द; महापालिका निवडणुकीसाठी वचननामा
10
“हिंदू आहोत, हिंदी नाही, इथल्या प्रत्येक शहरातील महापौर मराठीच होणार”: राज ठाकरे
11
“विधानसभा अध्यक्षांना निलंबित करावे”; पदाचा दुरुपयोग केल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप
12
“वचननामा नव्हे ‘वाचून’नामा”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे बंधूंवर खोचक टीका
13
“स्वतः विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेत, आधी उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”: आशिष शेलार
14
“उद्धव ठाकरे यांचा महापौर झाल्यास, मुंबईचे पाकिस्तान होईल”; अमित साटम यांनी केला प्रत्यारोप
15
राज्यातील प्रत्येक बसस्थानक-नगरपालिकेत पुस्तकांचे सवलतीत दुकान; DCM शिंदेंची साहित्य संमेलनात घोषणा
16
ठाण्यातून मराठी माणूस हद्दपार होतोय, मौनव्रत का? उद्धवसेनेचे नेते केदार दिघेंचा सवाल
17
बंडखोरी आटोक्यात; मात्र अपक्षांची डोकेदुखी कायम, ठाण्यात १३१ जागांसाठी ८६ अपक्ष रिंगणात
18
प्रचारादरम्यान भिवंडीत काँग्रेस-भाजपात झालेला राडा; दोन गटांतील २३ जणांवर गुन्हा
19
व्हेनेझुएलावर ताबा, राष्ट्राध्यक्षांवर चालणार खटला; देशाची व्यवस्था तात्पुरती अमेरिकेच्या ताब्यात
20
"कधीतरी थांबायला हवं..." भाजपा नेते नारायण राणेंचे निवृत्तीचे संकेत, समर्थकांसमोर झाले भावूक
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या ५९४ जागांसाठी ३,१३८ उमेदवारांत चुरस! ३३ बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 06:13 IST

अपक्ष उमेदवारांना शनिवारी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या निवडणुकांसाठी प्रचाराचा श्रीगणेशा रविवारपासून होत आहे. जिल्ह्यातील तीन महापालिकांमध्ये ३३ उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून ५९४ जागांसाठी तब्बल तीन हजार १३८ उमेदवार रिंगणात आहेत. अपक्ष उमेदवारांना शनिवारी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.

ठाणे महापालिकेत १३१ जागांसाठी हाेत असलेल्या निवडणुकीत सात जागांवर शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले.  कल्याण-डोंबिवलीत १२२ जागांसाठी ४९० उमेदवार रिंगणात असून महायुतीचे २० उमेदवार बिनविरोध निवडून आले. यात भाजपच्या १४ जागांसह शिंदेसेनेच्या सहा जागांचा समावेश आहे. आता १०२ जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी भाजप–शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना–मनसे युती, तसेच राष्ट्रवादी (अजित पवार) स्वबळावर आणि काँग्रेस–वंचित, राष्ट्रवादी (शरद पवार) स्वतंत्र ताकद आजमावणार आहे. काही ठिकाणी भाजप व शिंदेसेनेच्या उमेदवारांमध्येही थेट लढती होणार आहेत.

उल्हासनगर, नवी मुंबईत बिनविरोध विजय नाही

भिवंडीत ९० जागांसाठी ६३३ उमेदवार रिंगणात असून शिंदेसेनेचे ६ उमेदवार बिनविरोध विजयी झाले. भाजप–शिंदेसेना, काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यात तिरंगी लढती अपेक्षित आहेत. 

उल्हासनगरमध्ये ७८ जागांसाठी ४३२ उमेदवार रिंगणात आहेत. मीरा-भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवार मैदानात असून भाजप व शिंदेसेना यांच्यात थेट संघर्ष पाहायला मिळणार आहे.

नवी मुंबईत १११ जागांसाठी ४९९ उमेदवार रिंगणात असून, येथेही बिनविरोध विजय मिळालेला नाही. यामुळे येथे आता अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होणार आहेत. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Thane Municipal Elections: 3,138 Candidates Vie for 594 Seats, 33 Unopposed

Web Summary : Thane district's six municipal corporations see intense competition. 33 candidates won unopposed. 3,138 candidates are contesting for 594 seats. Key battles include Thane, Kalyan-Dombivli, Bhiwandi, Ulhasnagar, Mira-Bhayandar, and Navi Mumbai, with various alliances and independent contenders in the fray.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६Ulhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणूक २०२६Navi Mumbai Municipal Corporation Electionनवी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६Bhiwandi Nizampur Municipal Corporation Electionभिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणूक २०२६