शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Thane: कळवा हॉस्पिटलमध्ये एका दिवसांत ३ रुग्णांचा मृत्यू, उपचार न मिळाल्याने मृत्यू, नातेवाईकांचा आरोप

By अजित मांडके | Updated: August 10, 2023 23:12 IST

Thane: ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयामधील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.  येथे एका दिवसात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- अजित मांडकेठाणे  - ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयामधील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.  उपचार न मिळाल्याने रविंद्र सहाने ( २२ )  सुग्रीव पाल ( ३०) आणि भाऊराव सुराडकर ( ४५ ) असे तीन जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यु झाला असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर आक्रोश करत गोंधळ घातला. तर एका रुग्णाला पोलिसांनीच रुग्णालयात दाखल केले होते. हा रुग्ण रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडला होता. त्याचे नाव समजू शकलेले नाही.  घटनेची माहिती मिळताच आमदार जितेंद्र आव्हाड रुग्णालयांत पोहचले. आव्हाड यांनी रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

ठाणे जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना वरदान ठरत असलेल्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय आता मृत्यूचा आगार बनला आहे. कळवा हॉस्पिटलमध्ये उपचारच मिळत नसल्याची तक्रार रुग्णाच्या नातेवाईककडून केली जात आहे. एखाद्या रुग्णाला ऍडमिट करायचं असल्यास त्याच्याकडून मोबाईल चार्जिंगचे १००, आयसीयू बेड २०० तर ऑक्सिजन बेड २०० मागितले जात असल्याचा गंभीर आरोप रुग्णांच्या नातेवाइकानी केला आहे.

या तीनही केसमध्ये उपचार मिळाले नसल्याने आमचा रुग्ण दगावला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर कळवा रुग्णालयाची रुग्ण ऍडमिट करून घेण्याची क्षमता संपली असून आयसीयू देखील फुल असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.जे रुग्ण आले ते गंभीर अवस्थेत होते असा खुलासा प्रशासनाने केला आहे.

जितेंद्र आव्हाड भडकले आमदार जितेंद्र वाड्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत परिस्थिती जाणून घेतली. आव्हाड्यांच्या समोरच रुग्णाच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. रुग्णालयात बेडवरतीच मृतदेह पडले असल्याचे पाहून जितेंद्र आव्हाड कळवा हॉस्पिटल मधील डॉक्टरवणार भडकले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलDeathमृत्यूthaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड