शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आघाडीला २८ ते ३० जागा, जयंत पाटील यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 06:39 IST

देशातील वातावरण आता बदलत असून राज्यात आघाडीला २८ ते ३० जागा मिळतील, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांकडे केला.

ठाणे : देशातील वातावरण आता बदलत असून राज्यात आघाडीला २८ ते ३० जागा मिळतील, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांकडे केला. राज्यातील चौथ्या व अंतिम टप्प्यातील १७ जागांसाठी सोमवारी मतदान होणार आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. त्यानिमित्ताने पाटील हे ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. राज्यात वातावरण आघाडीला पोषक असल्याने अनेक जागांवर आघाडीला यश मिळेल, असे त्यांनी सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या झंझावाताचा भाजप-शिवसेनेला नक्कीच तोटा होणार आहे. त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्टपणाने जे काही मुद्दे मांडले, त्यातून सत्ताधाऱ्यांचे पितळ उघडे पडण्याचे काम झाले आहे. राज्यातील जनतेला सत्ताधाऱ्यांचा खरा चेहरा आता कळून चुकला असल्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो आता जनताच घेईल, असेही ते म्हणाले.

विधानसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे हे आघाडीसोबत एकत्र येतील किंवा नाही, हे त्यावेळीच स्पष्ट होईल. त्यावर, आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांची भाषणे केवळ राज्यात नव्हे तर देशपातळीवर गाजत आहेत. आपण मागणी लावून धरल्याने महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या दाव्याकडे पाटील यांचे लक्ष वेधले असता पाटील म्हणाले की, विखे काय बोलले, हे नक्की माहीत नाही, परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आघाडीच्या वतीने आंदोलन केले होते. चांदा ते बांदा संघर्षयात्रा काढली होती. विधानसभा बंद पाडण्याचे काम विरोधी पक्षांनी केले.

विरोधी पक्षाच्या दबावामुळेच सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागली. त्याची अंमलबजावणी करण्याचे काम आजही सुरू आहे. परंतु, त्याचे श्रेय एका व्यक्तीने घेणे योग्य ठरणार नाही. भाजप, शिवसेना एवढी घाबरली आहे की, आता सगळे हातातून गेल्यावर त्यांच्याकडून केवळ आपली अब्रू वाचवण्यासाठी राज ठाकरे यांनी व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून मांडलेल्या मुद्यांचे खंडन करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, हे त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशी टीका त्यांनी केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूक