शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

२७२ अधिकारी, कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी; आयुक्तांची मंजुरी, अनेक वर्षांच्या मागणीला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 23:50 IST

१२ तसेच २४ वर्ष सेवा करणारे कर्मचारी व अधिकाºयांना कालबध्द पदोन्नती नुसार वरिष्ठ वेतनश्रेणी लागू होते.

भाईंदर : मीरा भार्इंदर पालिकेत २४ आणि १२ वर्ष सेवा बजावणाºया तब्बल २७२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना अखेर आयुक्त बालाजी खतगावकर यांनी वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचाºयांचा यासाठी संघर्ष सुरू होता. आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर कर्मचाºयांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.१२ तसेच २४ वर्ष सेवा करणारे कर्मचारी व अधिकाºयांना कालबध्द पदोन्नती नुसार वरिष्ठ वेतनश्रेणी लागू होते. अशा पात्र कर्मचाºयांना हा लाभ देणे बंधनकारक आहे. या मागणीसाठी कर्मचाºयांच्या संघटनेचे गोविंद परब व पदाधिकारी सातत्याने काही वर्षांपासून तत्कालिन तसेच विद्यमान महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करत होते. मार्च २०१६ मध्ये कर्मचाºयांनी संपही पुकारला होता. त्यानंतर महासभेने ठराव करून पात्र कर्मचाºयांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याचा ठरावही केला. परंतु तत्कालिन उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी फेब्रुवारी २०१४ मध्ये मंजूर झालेल्या सेवाशर्तींमधील शैक्षणिक पात्रतेवर बोट ठेऊन १२ व २४ वर्ष सेवा देणाºया अधिकारी, कर्मचाºयांना वरिष्ठ वेतन श्रेणी देण्यात खोडा घातला होता. वास्तविक २०१४ मध्ये मंजूर झालेल्या सेवाशर्तींमध्ये स्पष्ट नमूद होते की, ज्या दिवशी सेवाशर्ती मंजूर झाले त्या दिवसांपासून त्यातील अटी लागू होतील. परंतु म्हसाळ यांनी कर्मचाºयांच्या विविध मागण्यांमध्ये नेहमीच आडकाठी चालवल्याने शेवटी मीरा- भाईंदर कामगार सेनेने त्यांच्यावर कारवाई करण्याची तक्रार केली होती.दुसरीकडे भाजप प्रणित श्रमिक जनरल कामगार संघटनेनेही वरिष्ठ वेतनश्रेणीची मागणी चालवली होती. म्हसाळ यांच्या बदलीनंतर मीरा- भाईंदर कामगार सेनेने पुन्हा पाठपुरावा केला. आयुक्तांना ही बाब निदर्शनास आणून दिली. अखेर सोमवारी आयुक्त बालाजी खतगावकर यांनी वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यास मान्यता दिली. अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याबद्दल कर्मचाºयांनी आनंद व्यक्त केला.आयुक्त खतगावकरांसह महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. रवी व्यास, सभागृह नेते रोहिदास पाटील, राजू भोईर आणि प्रवीण पाटील तसेच गोविंद परब यांनी कामगार सेनेच्या वतीने आभार मानले आहेत.या कर्मचाºयांनामिळणार लाभ२४ वर्ष सेवा पूर्ण झालेले १३३ कर्मचारी असून त्यात १०७ सफाई कामगार आहेत. शिवाय शिपाई, मुकादम तसेच वर्ग तीनचे स्वच्छता निरीक्षक, लिपीक व वाहनचालक यांचा समावेश आहे. १२ वर्ष सेवा पूर्ण केलेल्या १३९ जणांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांपासून वर्ग एकपर्यंतचे अधिकारी आहेत. सफाई कामगार अधिक असून त्या शिवाय शिपाई, लिपीक, उद्यान अधीक्षक, उपअभियंता आदी विविध पदांवरील कर्मचारी, अधिकारी अहेत.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर