शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावे, दिव्याला जादा पाणी

By admin | Updated: May 3, 2017 05:24 IST

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केडीएमसीच्या हद्दीतील २७ गावांना २५ तर ठाणे महापालिका हद्दीतील दिव्याला १० एमएलडी

कल्याण : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केडीएमसीच्या  हद्दीतील २७ गावांना २५ तर ठाणे महापालिका हद्दीतील दिव्याला १० एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचे निर्देश मंगळवारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीत हे निर्देश देण्यात आले. २७ गावे आणि दिवा येथे भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईमुळे तेथील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. त्यातून गेले वर्षभर नागरिकांनी वेगवेगळ््या माध्यमातून आपल्या नाराजीला तोंड फोडले आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, तसेच दोन्ही महापालिकांमधील पदाधिकाऱ्यांनी येथील पाण्याचा कोटा वाढवण्याची मागणी जलसंपदामंत्री महाजन, पालकमंत्री शिंदे आणि एमआयडीसी यांच्याकडे केली होती. याची दखल घेत हा कोटा वाढवून देण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात एका विशेष बैठक झाली. या प्रसंगी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. शिंदे, आमदार सुभाष भोईर, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, सभागृह नेते राजेश मोरे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अन्सारी आदी अधिकारी उपस्थित होते.पाणीटंचाईमुळे दिवा परिसरातील नागरिक मुंब्रा येथून रेल्वेने पाणी आणत असल्याकडे, त्यातून दुर्घटना घडून काही जणांना जीव गमवावा लागल्याकडे डॉ. शिंदे यांनी या वेळी महाजन यांचे लक्ष वेधले. यंदाचा उपलब्ध पाणीसाठा समाधानकारक असल्यामुळे २७ गावे तसेच दिव्यासाठी पाण्याचा कोटा वाढवून देण्याची आग्रही मागणी या वेळी करण्यात आली. त्यानुसार २७ गावांसाठी २५ आणि दिव्यासाठी १० एमएलडी पाणी वाढवून देण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले. महाजन यांनी दिलेल्या निर्देशाबाबत त्यांचे उपस्थितांनी आभार मानले. (प्रतिनिधी)निर्देशच देतात, पण ठोस कृती कधी?केडीएमसीतील २७ गावांना एमआयडीसीकडून ३५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. मागील उन्हाळ््यात पाणीकपातीमुळे १७ ते १८ दशलक्ष लिटर पाणी ग्रामीण भागाला मिळत होते. यंदा चांगला पाऊस होऊनही २७ गावांमध्ये पाणीटंचाई आहे.ग्रामीण भागातील भाजपाच्या नगरसेवकांनी काही महिन्यांपूर्वीजलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन अतिरिक्त ३० दशलक्ष लिटर पाणी देण्याची मागणी केली होती. यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेअंती प्रतिदिन वाढीव १७ दशलक्ष लिटर पाणी देऊ, या निर्णयावार शिक्कामोर्तब करण्यात आले होते. परंतु, आजतागायत त्याची अंमलबजावणी झालेली नाही.गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याने मार्चमध्ये २७ गावांतील नागरिकांनी महापालिका मुख्यालयावर भव्य हंडाकळशी मोर्चा काढला होता. सरकारकडून अतिरिक्त पाण्याचा कोटा मंजूर झाला, याची अंमलबजावणी एप्रिल अखेरपर्यंत होण्याची शक्यता होती. परंतु, तीही झाली नाही. आता पुन्हा जलसंपदा मंत्र्यांनी अतिरिक्त पाणीसाठा देण्याचे निर्देश दिले आहेत. आजवर केवळ निर्देशच देण्यात आले आहेत, पण ठोस कृती होत नाही, असा सूर गावांमध्ये उमटत आहे.