शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर रेल्वे स्थानकात तरुणाला 27 लाखांच्या परकीय चलनासह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 06:11 IST

उल्हासनगर रेल्वे स्थानकात दुपारी एका १९ वर्षीय तरुणाकडून तब्बल साडे सत्तावीस लाख रुपयांचे परकीय चलन जप्त केले. पियुष  कलवानी असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा नागपूरचा रहिवासी आहे.

उल्हासनगर :  उल्हासनगर रेल्वे स्थानकात दुपारी एका १९ वर्षीय तरुणाकडून तब्बल साडे सत्तावीस लाख रुपयांचे परकीय चलन जप्त केले. पियुष  कलवानी असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा नागपूरचा रहिवासी आहे.

उल्हासनगर रेल्वे स्थानकात एक तरुण परकीय चलन घेउन येणार असल्याची माहिती,  रेल्वे पोलिसांना गुप्त माहितगार कडून मिळाली. त्या आधारे संशयित 19 वर्षाच्या तरुणाला ताब्यात घेउन झडती घेतली. यावेळी त्याच्या चपलेतून आणि बॅगच्या हँडलमधून डॉलर्सचा अक्षरशः खच पडला. यात अमेरिकन डॉलर, सिंगापूर डॉलर आणि कतारच्या चलनाचा समावेश आहे.

परकीय चलनाच्या नोटा आपण ठाणे येथील एका इसमाकडून घेऊन, नागपूरला नेत असल्याची कबुली तरुणाने ल रेल्वे पोलिसांना दिली. मात्र सकाळी साडेनऊ वाजता त्याला पकडून,कल्याण जीआरपी कार्यालयात नेल्याचे त्याने पोलिसाना सांगितले. परकीय चलन सापडल्यानंतरही,  संध्याकाळपर्यंत साधा पंचनामा झाला नसल्याची बाब समोर आली आहे.

टॅग्स :ArrestअटकCrimeगुन्हा